प्रतिनिधी
मुंबई : नव्या संसद भवनाचे उद्घाटन २८ मे 2023 रोजी सावरकर जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कार्यक्रमावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज संसदेत पार पडलेले कार्यक्रम पाहून मी तेथे गेलो नाही याचे आणखी समाधान वाटत आहे, अशा शब्दांत पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इतकेच नाही तर संसदेत पवित्र सेंगोल प्रतिष्ठापनेवर शरद पवारांनी प्रतिगामीत्वाचा शिक्का मारला आहे. Pawar stamped the reactionary stamp on Sengol installation in Parliament
शरद पवार म्हणाले की, सकाळी मी हा कार्यक्रम पाहिला. तो पाहिल्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो नाही याचे आणखी मला समाधान वाटत आहे. त्याचे कारण ज्या लोकांची तिथे उपस्थिती होती आणि जे काही धर्मकांड सुरू होते ते पाहिल्यानंतर आधुनिक भारताची संकल्पना जी जवाहारलाल नेहरूंनी मांडली, ती आणि सध्या जे सुरू आहे त्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, असा दावा पवारांनी केला.
पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटत आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. नेहरूंनी अधुनिक विज्ञानावर आधारित समाज तयार करण्याची भूमिका सतत मांडली आज जे चाललंय ते याच्या नेमके उलट सुरू असल्याचाही दावा शरद पवारांनी केला.
Pawar stamped the reactionary stamp on Sengol installation in Parliament
महत्वाच्या बातम्या
- ‘विकसित भारत @ 2047’ संकल्पनेचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन वचनबद्ध – एकनाथ शिंदे
- द फोकस एक्सप्लेनर : कोण आहेत पद्मा सुब्रमण्यम? ज्यांनी पीएमओला लिहिलेल्या पत्राद्वारे जगासमोर आले ‘सेंगोल’, वाचा सविस्तर
- वैद्यकीय क्षेत्रात ”इंटिग्रेटेड अप्रोच” काळाची गरज – डॉ. माधुरी कानिटकर
- India First : भारताच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचे भीष्म पितामह स्वातंत्र्यवीर सावरकर!!