• Download App
    ManikRao kokate माणिकराव कोकाटेंची विकेट काढण्यासाठी पवार कुटुंब एकवटले; रोहित पवारांच्या बरोबरच सुप्रिया सुळेंची दिल्लीतून "राजकीय गोलंदाजी"!!

    माणिकराव कोकाटेंची विकेट काढण्यासाठी पवार कुटुंब एकवटले; रोहित पवारांच्या बरोबरच सुप्रिया सुळेंची दिल्लीतून “राजकीय गोलंदाजी”!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : विधिमंडळात ऑनलाइन रमी खेळणारी किंवा न रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची विकेट काढण्यासाठी पवार कुटुंब एकवटले आहे. रोहित पवारांच्या बरोबरच सुप्रिया सुळेंनी दिल्लीतून त्यासाठी “राजकीय गोलंदाजी” केली आहे. ManikRao kokate

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केल्यानंतर देखील माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा द्यायला नकार दिला. उलट आपली बदनामी करणाऱ्यांना आपण कोर्टात खेचू, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला‌. ऑनलाइन रमी प्रकरणाची चौकशी विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांनी करावी. त्यामध्ये मी दोषी आढळलो, तर थेट राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन, असे वक्तव्य कोकाटे यांनी नाशिक मधल्या पत्रकार परिषदेत केले.

    त्यानंतर रोहित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा ऑडिओ सकटचा व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये दुष्काळग्रस्त आदिवासी बांधवांना दुधाळ गाई देण्याचा विषय विधिमंडळात चर्चेस आला असताना माणिकराव ऑनलाईन रमी खेळत होते, असा दावा केला.

    त्याआधी सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन माणिकराव कोकाटे यांच्या विषयी तक्रार केली महाराष्ट्राला असा असंवेदनशील कृषिमंत्री नको. चांगला संवेदनशील कृषिमंत्री द्या, अशी मागणी त्यांनी चौहान यांच्याकडे केली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या समावेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे, बजरंग सोनवणे, धैर्यशील मोहिते यांच्याबरोबरच महाविकास आघाडीचे अन्य पक्षांचे देखील खासदार होते. चौहान यांच्या भेटीचा फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला.

    कोणत्याही परिस्थितीत माणिकराव कोकाटे यांची राजकीय विकेट काढायचीच यासाठी अशा पद्धतीने पवार कुटुंबीय एकवटले. या प्रकरणाची सुरुवात रोहित पवारांनीच केली. त्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी देखील त्यांना साथ दिली. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीला साथीला घेतले.

    Pawar family Unites against ManikRao kokate

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CJI BR Gavai : CJI म्हणाले- परीक्षेतील गुण-रँक यश निश्चित करत नाहीत; यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक

    राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे यात्रा; पण काँग्रेसच्या आमदाराने संतापातून बोलून दाखवली कर्नाटकातली हतबलता!!

    Karnataka : कर्नाटक- काँग्रेस आमदार केसी वीरेंद्रना EDकडून अटक; छाप्यात 12 कोटींची रोकड आणि 6 कोटींचे दागिने जप्त