वृत्तसंस्था
सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघाचा नवा कर्णधार म्हणून पॅट कमिन्सची निवड केली आहे. तो ऑस्ट्रेलियाचा ४७वा कसोटी कर्णधार ठरला आहे. स्टीव्ह स्मिथला उपकर्णधार बनवले आहे. ६५ वर्षात पहिल्यांदाच एखादा गोलंदाज ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व करेल. कमिन्सने टिम पेनची जागा घेतली आहे. Pat Cummins is officially the 47th captain of the Aussie Men’s Test team #Ashes
एका महिलेला अश्लील फोटो आणि संदेश पाठवल्याबद्दल खेद व्यक्त करत पेनने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ऍशेस मालिका होणार आहे. पॅट कमिन्सने आतापर्यंत ३४ कसोटी, ६९ एकदिवसीय आणि ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कमिन्स कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.
रेमंड लिंडवॉल यांनी भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते. रे लिंडवॉल हे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारे शेवटचे वेगवान गोलंदाज होते. तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाला ही संधी मिळाली नाही.
Pat Cummins is officially the 47th captain of the Aussie Men’s Test team #Ashes
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेसचा बंगळुरूमधील भंगारवाला देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार, १७०० कोटींहून अधिक संपत्ती, शिक्षण केवळ पाचवी
- मतांनी नव्हे तर लष्कराच्या पाठिंब्याने इम्रान खान सत्तेवर, नवाझ शरीफ यांना भ्रष्टाराचाच्या जाळ्यात अडकविण्याचाही कट
- WATCH : वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हिंगोलीत साकारतेय घनदाट जंगल
- सुप्रिम कोर्ट आदेश पाळत परमबीर सिंहांचे चौकशीत सहकार्य; साडेसहा तास चौकशीत सर्व आरोप फेटाळले!