वृत्तसंस्था
पाटणा : बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टीत उभी फूट पडली असून पाच खासदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. त्यामध्ये बंडखोर खासदारांचे नेतृत्व करणारे पशुपतीनाथ पारस यांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. Paswan’s Lok Janshakti Party split; Goodbye to the party of five MPs
लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक, दिवगंत नेते रामविलास पासवान यांचे पशुपतीनाथ पारस हे बंधू आहेत. पाच खासदारांच्या बंडामुळे पक्षाचे सर्वेसर्वा आणि रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना मोठा झटका बसला आहे. बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टीने भाजपप्रणीत लोकशाही आघाडीशी केलेली युती तोडून स्वतंत्र निवडणूक लढविली होती. परंतु पराभव झाल्यानंतर पार्टीत धुसफूस सुरु होती. आता त्याचे पर्यावसन पार्टी दुभंगण्यात झाले आहे. पाच बंडखोर खासदारांनी आता संसदेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यावी, असे पत्र लोकसभा अध्यक्षांना पाठविले आहे. या सर्व घडामोडी आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराशी निगडित असल्याचे स्पष्ट होत आहे.
चिराग पासवान एकटे पडले
लोक जनशक्ती पार्टीत फूट पडल्यामुळे रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान एकटे पडले आहे. पार्टीत फूट पाडण्यास जनता दलाचा एक मात्तबर खासदार जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. पाच बंडखोर खासदारांमध्ये पशुपतीनाथ पारस, प्रिन्स पासवान, वीणा सिंह, चंदन कुमार आणि जनता दलाचे मेहबूब अली कैसर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
पशुपतीनाथ पारस केंद्रीय मंत्रिमंडळात ?
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त आहे. त्यावर बंडखोर खासदारांच्या गटाला स्थान मिळू शकते, अशी शक्यता असून पशुपतीनाथ पारस हे स्थान प्राप्त करू शकतील. त्यांना संयुक्त जनता दलाचे कोट्यातून मंत्रिपद मिळू शकते. हाजीपुर लोकसभा मतदारसंघातून पारस हे निवडून आले होते.
एकमेव आमदारही जनता दलात सामील
बिहार विधानसभा निवडणुकीत १४३ जागांपैकी एकच जागा लोक जनशक्ती पार्टीला मिळविता आली. माहिटानी मतदारसंघातून विजयी झालेले रामकुमार शर्मा यांनी चिराग पासवान यांची साथ सोडून संयुक्त जनता दलात प्रवेश केला. त्यामुळे लोक जनशक्तीचा हा एकमेव आमदार ही आता पक्षाचा राहिलेला नाही.
Paswan’s Lok Janshakti Party split; Goodbye to the party of five MPs
महत्वाच्या बातम्या
- चीनी ड्रॅगनच्या महत्वाकांक्षांना रोखण्यासाठी अतिश्रीमंत देश आले एकत्र
- पाचगणी पर्यटकांनी फुलले, पर्यटकांच्या गर्दीने टेबललॅण्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी
- आशा कर्मचार्यांची निराशा ! फुटकी कवडीही न देता ठाकरे सरकार नुसतेच गातात गोडवे ;१२ तास काम-आशा कर्मचारी वेठबिगार ; ७० हजार ‘आशांचा’ बेमुदत संप
- PM MODI PLEASE HELP : राजकीय एजंट्स पासून धोका-महाराष्ट्र सोडून कायमचा दिल्लीला ; ठाण्याच्या वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुलेंचे खळबळजनक ट्विट
- हाँगकाँग, झिजियांग प्रातांमधील मानवाधिकाराच्या हननावरून जी – ७ आणि मित्र देशांनी चीनला फटकारले
- अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा चीनविरोधात आव आक्रमक; भाषा गुळमुळीत!!
- चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्पाला लोकशाही पर्यायी प्रकल्प देण्याचे जी – ७ देशांचे सूतोवाच
- Electric Vehicle : इलेक्ट्रिक दुचाकी आता होणार स्वस्त; केंद्र सरकारने अनुदानाची रक्कम वाढविली