विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संयुक्त जनता दल अर्थात JD(U) हा पक्ष नितीश कुमार यांनी अखेर आपल्या ताब्यात घेतला. पक्षाध्यक्ष खासदार लल्लनसिंह यांनी राजीनामा देऊन नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो JD(U) च्या राष्ट्रीय कार्यकारिणीने ताबडतोब मंजूर केला, पण यामुळे बिहार मधल्या 43 आमदारांचा पक्ष आणि नितीश कुमार बनलेJD(U) चे “राष्ट्रीय” अध्यक्ष ही खरी बातमी तयार झाली!!Party of 43 MLAs in Bihar; Nitish Kumar becomes “National” President of JD(U)!!
कारण मुळात JD(U) आता खऱ्या अर्थाने “राष्ट्रीय पक्ष” उरलेला नाही. निवडणूक आयोगाने त्या पक्षाच्या राष्ट्रीय दर्जा केव्हाच काढून घेतला आहे. JD(U) पक्षाचे सध्या फक्त बिहारमध्ये 43 आमदार आहेत आणि भाजप बरोबर 2019 च्या निवडणुकीत बिहारमध्ये युती केल्याने पक्षाला 16 खासदार निवडून आणता आले होते. यापैकी बहुसंख्य खासदार आता भाजपच्या रस्त्याला वळले आहेत आणि ते नितीश कुमार यांना सध्या तरी नको आहे. त्यामुळेच त्यांनी पक्षाच्या “राष्ट्रीय” अध्यक्ष पदावरून लल्लनसिंह यांना बाजूला करून त्या पदावर स्वतःची वर्णी लावून घेतली आहे.
आपल्या नव्या खेळीमुळे बिहारमध्ये JD(U) अखंड राहील महाराष्ट्रातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासारखा आपला पक्ष फुटणार नाही आणि तो आपल्या ताब्यात राहील असा नितीश कुमार यांचा होरा आहे. पण प्रत्यक्षात तसे घडेलच याची बिलकुल शाश्वती नाही.
JD(U) मधल्या अंतर्गत घडामोडी संदर्भात बिहार मधल्या राजकीय वर्तुळातून अशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. लल्लन सिंह यांचा राजीनामा आणि नितीश कुमार यांनी पक्ष ताब्यात घेणे हा खेळाचा शेवट नसून ही खेळाची सुरुवात आहे. अजून बिहारमध्ये बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत, अशी टिप्पणी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान भाजप खासदार सुशीलकुमार मोदी यांनी व्यक्त केली केली, तर कोणताही स्वाभिमानी व्यक्ती अशा प्रकारे आपली अध्यक्षपदावरून विदाई सहन करू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया बिहार विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा यांनी व्यक्त केली आहे या दोन प्रतिक्रियांमधूनच बिहार मधल्या पुढच्या घडामोडींची स्फोटक बीजे दडल्याचे दिसत आहे.
Party of 43 MLAs in Bihar; Nitish Kumar becomes “National” President of JD(U)!!
महत्वाच्या बातम्या
- अयोध्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देशभरातील ‘या’ VVIP व्यक्तींना निमंत्रण!
- ऋषभ पंतसह अनेक हॉटेल मालकांची फसवणूक करणाऱ्या क्रिकेटपटूला अटक
- अबुधाबीमध्ये पहिले हिंदू मंदिर तयार, पंतप्रधान मोदी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार
- पंतप्रधान मोदी दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार