• Download App
    भारतीय इतिहासात प्रथमच पंतप्रधानांनी 14 ऑगस्ट रोजी उघडपणे व्यक्त केली फाळणीची वेदना...!! Partition’s pains can never be forgotten. Millions of our sisters and brothers were displaced and many lost their lives due to mindless hate and violence.

    भारतीय इतिहासात प्रथमच पंतप्रधानांनी 14 ऑगस्ट रोजी उघडपणे व्यक्त केली फाळणीची वेदना…!!

    फाळणीच्या दिवसातील वेदनांबाबत पंतप्रधान मोदींकडून ट्विट


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात प्रथमच भारताच्या पंतप्रधानांनी फाळणीच्या दिवसांमधल्या वेदनादायक आठवणीवर आपले दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 14 ऑगस्ट या दिवशी, पाकिस्तान आपला निर्मिती दिन साजरा करत असताना भारतासाठी मात्र हा फाळणीचा दिवस असल्याचे स्पष्ट केले आहे. Partition’s pains can never be forgotten. Millions of our sisters and brothers were displaced and many lost their lives due to mindless hate and violence.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून फाळणीच्या मुक्या वेदनांना वाट करून दिली आहे. 14 ऑगस्ट 1947 हाच तो दिवस आहे, ज्या दिवशी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यामुळे आपल्या लाखो बांधवांना प्राणाला, मालमत्तेला आणि आपल्या सहोदरांना गमवावे लागले होते. ही कोट्यावधी भारतीयांसाठी अत्यंत वेदनादायी घटना आहे. फाळणीच्या या दर्दनाक घटनेचे हे स्मरण आहे, अशा भावपूर्ण शब्दांत मोदींनी आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत.

    भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे. भारतीय पंतप्रधानांनी अधिकृतरित्या फाळणीच्या वेदना जाहीर स्वरूपात मांडणे याला भावनेपलीकडचे देखील महत्त्व आहे. भारतीयांसाठी फाळणी ही कटू आठवण आहे. तो फक्त एका देशाच्या निर्मितीचा दिवस नाही, तर त्यामागची हिंसाचाराची पार्श्वभूमी फार भयानक आहे. हीच आठवण एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागविली आहे.

    कोट्यवधी भारतीयांच्या मनात अखंड भारताविषयी आजही प्रेम आहे. किंबहुना ती त्यांची आकांक्षा आहे. हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्विटमधून दाखवून दिले आहे. 14 ऑगस्ट हा फाळणीचा दिवस आणि 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा दिवस 75 वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांनी आणि सरकारांनी 15 ऑगस्ट याच दिवसाला महत्त्व देऊन 14 ऑगस्ट या दिवसाचा वेदनादायी इतिहास जणू दडपून टाकला होता. करोडो भारतीयांच्या मनात ठसठसणारी फाळणीची वेदना जणू आपली नाहीच, अशी त्यांची भावना होती.

    परंतु आता नरेंद्र मोदी यांनी तिला वाट करून यात असणाऱ्या जखमेवरची खपली काढली आहे. खऱ्या अर्थाने आपला फाळणीचा इतिहास कटू आहे. वेदनादायी आहे. तरीही तो आठवणी ठेवून पुढची वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे, हेच यातून पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदी यांनी ठळकपणे अधोरेखित केले आहे.

    Partition’s pains can never be forgotten. Millions of our sisters and brothers were displaced and many lost their lives due to mindless hate and violence.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य