Sunday, 11 May 2025
  • Download App
    धर्माच्या आधारावर फाळणी ही ऐतिहासिक चूक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन|Partition on the basis of religion is a historic mistake, states Defense Minister Rajnath Singh

    धर्माच्या आधारावर फाळणी ही ऐतिहासिक चूक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :: सन १९७१ च्या युद्धातील पराभवानंतर पाकिस्तान सतत छुपे युद्ध लढत आहे. तेव्हा झालेल्या प्रत्यक्ष युद्धात आमचा विजय झाला होता आणि या अप्रत्यक्ष युद्धातही विजय आमचाच असेल. धर्माच्या आधारावर भारताची फाळणी करणे, ही ऐतिहासिक चूक होती, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.Partition on the basis of religion is a historic mistake, states Defense Minister Rajnath Singh

    राजनाथ सिंह म्हणाले, १९७१ च्या युद्धात आमच्या सशस्त्र दलांनी मुक्तिवाहिनीला पाठिंबा दिला. लाखो निर्वासितांना मदत केली. तसेच पश्चिम आणि उत्तरेकडील सर्व प्रकारचे आक्रमण रोखले. त्यांनी शांतता, न्याय आणि मानवतेसाठी भारताच्या वचनबद्धतेची विश्वासार्हता सुनिश्चित केली.



    इतिहासात हे क्वचितच पाहायला मिळते की, एखाद्या देशाला युद्धात पराभूत केल्यानंतर दुसरा देश आपले वर्चस्व लादत नाही, तर आपल्या राजकीय प्रतिनिधीकडे सत्ता सोपवतो. भारताने हे केले कारण तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले.

    राजनाथ सिंह यांनी बिपीन रावत यांची विशेष आठवण काढली. देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांची मला खूप आठवण येते आहे. देशाने एक पराक्रमी सैनिक, सक्षम सल्लागार आणि चांगला माणूस गमावला.

    Partition on the basis of religion is a historic mistake, states Defense Minister Rajnath Singh

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    SIA raids : दहशतवादाशी संबंधित प्रकरणी SIAचे जम्मू अन् काश्मीरच्या शोपियानमध्ये छापे

    ISRO’s 7 : द फोकस एक्सप्लेनर : इस्रोचे 7 उपग्रह भारतीय लष्कराचे डोळे; पाक सैन्य तळासह अतिरेकी लाँच पॅडची अचूक माहिती

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्याची धडक कारवाई रावळपिंडीपर्यंत पोहोचली, राजनाथ सिंहांनी प्रथमच उघडपणे सांगितली कहाणी!!