विशेष प्रतिनिधी
मुंबई : काही प्रसंग.. क्षण आयुष्य अजरामर करतात. असाच एक क्षण महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानीच्या अधिष्ठानाने पुण्यभू तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावचे श्री. महादेव गायकवाड यांच्या आयुष्यात आला आहे. त्यांच्या कार्याने त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा बहुमान मिळवून दिला आहे. अयोध्येच्या सोहळ्यात 11 कुटुंबांना पूजेचा मान मिळाला आहे, त्यामध्ये महादेव गायकवाड आणि त्यांच्या पत्नीचा सहभाग असणार आहे. Participation of Mahadev Gaikwad of Tuljapur
महादेव गायकवाड निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांचे कार्य इतके समृद्ध आणि सामाजिक उन्नतीचे आहे की त्यामुळे त्यांना, प्रभू श्रीरामाच्या पूजेचा मान मिळाला आहे. अयोध्येतील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पूजेसाठी बसण्याचा मान भारतातील 11 कुटुंबांना मिळाला. त्यात श्री महादेवराव गायकवाड उभयता सहभागी होणार आहेत.
पारधी समाजाच्या उत्त्थानासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भटक्या विमुक्त शाखेच्या माध्यमातून ते अविश्रांत कार्यरत आहेत. या कार्याची अभूतपूर्व पावती म्हणजे, प्रभू श्रीरामाच्या पहिल्या पूजेचा बहुमान आहे.
” देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके,
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्यासारखे.. “
प्रा. गायकवाड यांना मिळालेला प्रभू श्रीरामाचा हा आशीर्वाद बघून हे काव्य मला आठवले.
आणि, शबरीच्या भक्ती व निष्ठेची कहाणी आठवली.. कदाचित ती यापेक्षा वेगळी नसावी, अशा भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
Participation of Mahadev Gaikwad of Tuljapur
महत्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्षांचा कौल शिंदेंच्या पारड्यात; अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा विरली हवेत!!
- उपराष्ट्रपतींना अयोध्येचे निमंत्रण; आधी वेळ कळवून परिवारासह घेणार श्री रामलल्लांचे दर्शन!!
- या वर्षी दहा पैकी नऊ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग नफ्यात राहण्याची चिन्हं!
- ग्रीस समलिंगी विवाह, दत्तक प्रक्रियेस कायदेशीर मान्यता देणार!