• Download App
    "मिमिक्रीवीर" खासदार कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधींवर संसदीय शिस्तभंग समितीचा बडगा; खासदारकी जाण्याचा धोका!! Parliamentary Disciplinary Committee on Kalyan Banerjee and Rahul Gandhi

    “मिमिक्रीवीर” खासदार कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधींवर संसदीय शिस्तभंग समितीचा बडगा; खासदारकी जाण्याचा धोका!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची संसदेच्या पायऱ्यांवर मिमिक्री करणे “मिमिक्रीवीर” खासदार कल्याण बॅनर्जी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना चांगलीच भोवण्याची चिन्हे आहेत. कारण सुप्रीम कोर्टातील वकील विनीत जिंदल यांनी कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात संसदेच्या शिस्तभंग समितीकडे तक्रार दाखल केली आहे. Parliamentary Disciplinary Committee on Kalyan Banerjee and Rahul Gandhi

    संसदेच्या सभागृहांमध्ये, संसदेच्या आवारात घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीची मिमिक्री करून खिल्ली उडवून अपमान करणे हे संसदेच्या प्रतिष्ठेला आणि घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेला शोभेदायक नाही. हे शिस्तबाह्यवर्तन कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधींनी केले आहे. सबब त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, असे विनीत जिंदल यांनी संसदेच्या शिस्तभंग समितीसमोर केलेल्या अर्जात म्हटले आहे. यातून त्यांनी कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधींच्या खासदारकीवर कायदेशीर बडगा उगारला आहे.

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जींनी उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याच्या घटनेला आता राष्ट्रीय पातळीवर वादाचे वळण लागले आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान मधील जाट शेतकरी समाज कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधींवर प्रचंड संतापला आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड जाट शेतकरी समाजातले प्रतिष्ठित नेते आहेत.

    कल्याण बॅनर्जींनी त्यांची संसदेच्या पायऱ्यावर उभे राहून मिमिक्री केली. राहुल गांधींनी त्यांना या शिस्तभंगाच्या वर्तनापासून रोखण्याचा ऐवजी त्या मिमिक्रीचा व्हिडिओ बनवला. तो व्हायरल केला. त्यामुळे जाट समाजात शेतकरी समाजात प्रचंड संताप उसळला. कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधींनी माफी मागावी अन्यथा कल्याण बॅनर्जी यांचे घर आम्ही पाडून टाकू अशी धमकीच जाट शेतकरी समाजाने समाजाच्या खाप पंचायतीने दिली.

    पण त्या पलीकडे जाऊन संसदेच्या शिस्तभंग समिती समोरच सुप्रीम कोर्टातले वकील विनीत जिंदल यांनी संसदीय कामकाज नियम नियम आणि व्यवहार यांचा आधार घेत कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधींवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची खासदारकी रद्द करण्याचा अर्ज दाखल केला. या अर्जाचा आता संसदेच्या शिस्तभंग समितीला विचार करणे भाग आहे. त्यानुसार कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधीनाही नोटिसा पाठवून त्यांचे उत्तर मागवणे भाग आहे. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दोघांच्या खासदारकी रद्द करण्याबाबत शिफारस करून ती संसदेच्या दोन्ही सभागृहातून मंजूर करून घ्यावी लागणार आहे. कारण कल्याण बॅनर्जी हे राज्यसभेचे खासदार आहेत, तर राहुल गांधी हे लोकसभेचे खासदार आहेत. त्यामुळे संसदेच्या संयुक्त शिस्त भंग समिती समोर त्यांना उभे राहून आपल्या वर्तणुकीचा खुलासा करावा लागणार आहे.

    आता या कायदेशीर बडग्यावर वकील असलेले खासदार कल्याण बॅनर्जी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले खासदार राहुल गांधी नेमके काय उत्तर देतात आणि त्या कचाट्यात कसे अडकतात?? किंवा त्या कचाट्यातून कसे बाहेर येतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Parliamentary Disciplinary Committee on Kalyan Banerjee and Rahul Gandhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकात मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकवायची मारामार; पण त्यांना आता आठवला प्रोटोकॉल!!

    Kavinder Gupta : लडाखमध्ये LG आणि हरियाणा-गोव्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती; कविंदर गुप्ता यांना केंद्रशासित प्रदेशाची जबाबदारी

    India iphone : भारतात आयफोन बनवणाऱ्या अभियंत्यांना चीनने परत बोलावले; केंद्र सरकारने म्हटले- ॲपलकडे अजूनही पुरेसे अभियंते