विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकांनंतर संसदेच्या अधिवेशनाला आणि विरोधकांच्या असहकार तसेच बहिष्काराला आज एकाच वेळी सुरुवात झाली. राष्ट्रपतींनी नेमलेल्या प्रोटेम स्पीकर पॅनलवरच्या विरोधी सदस्यांनी पॅनलवर बहिष्कार घातला. 18 व्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकार विरुद्ध असहकार पुकारला. Parliament session non-cooperation and boycott of opposition starts at the same time
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरु झाला. मोदी 3.0 सरकारचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले. अधिवेनाच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना सोबत घेऊन जनतेसाठी काम करण्याचा संकल्प केला. परंतु मोदी 3.0 सरकारमध्ये मजबूत झालेल्या विरोधकांनी पहिल्याच दिवशी मोदी सरकारला झटका दिला. हंगामी अध्यक्षाच्या पॅनेलवर विरोधकांनी बहिष्कार घातला. इंडी आघाडीच्या तीनही सदस्यांनी हंगामी अध्यक्षाच्या (प्रोटेम स्पीकर) पॅनेलवर बहिष्कार टाकला. काँग्रेसचे के. सुरेश, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय आणि डीएमकेचे टीआर बालू यांनी पॅनेलवर बहिष्कार घातला.
अध्यक्ष निवडीनंतर पुन्हा नवीन पॅनल
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी के. सुरेश, सुदीप बंदोपाध्याय आणि टीआर बालू या तिघांनाही प्रोटेम स्पीकरच्या पॅनलमध्ये नियुक्त केले होते. परंतु या तिघांनी त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. प्रोटेम स्पीकरच्या पॅनेलचे तीन सदस्य प्रोटेम स्पीकरला मदत करणार नाहीत. ते नवीन खासदारांना शपथ देणार नाहीत. हे पॅनल फक्त नवीन खासदारांना शपथविधी पुरता तयार केले आहे. लोकसभा अध्यक्ष निवडीनंतर पुन्हा नवीन पॅनल बनवले जाईल.
इंडी आघाडीच्या खासदारांच आंदोलन
संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी हातात संविधान घेऊन इंडिया आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केले. सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील खासदार या आंदोलनात सहभागी झाले.
नरेंद्र मोदी यांनी घेतली शपथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी, तालिकाध्यक्ष राधामोहन सिंह यांनी खासदार पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी शपथ घेत असताना सभागृहात भाजप खासदारांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. महाष्ट्रातील पाच मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ हे आज शपथ घेणार आहेत. तसेच गोवाल पाडवी, शोभा बच्छाव, स्मिता वाघ, अनुप धोत्रे, बळवंत वानखेडे, अमर काळे, श्यामकुमार बर्वे, प्रशांत पडोळे, नामदेव किरसान, प्रतिभा धानोरकर, संजय देशमुख आधी खासदार शपथ घेणार आहेत.
Parliament session non-cooperation and boycott of opposition starts at the same time
महत्वाच्या बातम्या
- मराठा महासंघाच्या बैठकीत मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक, जरांगेंना पाठिंबा; मोदी सरकारकडे मागण्या!!
- छत्तीसगडमधील सुकमा येथे IED स्फोट ; CRPF चे दोन जवान शहीद!
- राष्ट्रवादीच्या आमदाराच्या पुतण्यावर 304 कलमाखाली गुन्हा, पण जामिनाचा मार्ग मोकळा; पोलिसांवर आमदाराचा दबाव??
- NEET पेपर लीक : CBI कारवाईत, शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून पहिला FIR दाखल