विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेचे सत्र संपले. त्याचबरोबर 142 खासदारांचे निलंबनही रद्द झाले, पण INDI आघाडीच्या नेत्यांची आंदोलनाची “जिद्द” आजही कायम राहिली. राजधानी जंतर-मंतरवर INDI आघाडीच्या नेत्यांनी मोदी सरकार विरुद्ध आंदोलन केले.Parliament session ends, suspension of MPs also revoked; But the “stubbornness” of the leaders of the INDI front even today!!
वास्तविक 142 खासदारांचे निलंबन हा विषय फक्त संसदेच्या हिवाळी अधिवेशनापुरताच मर्यादित होता. 4 डिसेंबर पासून सुरू झालेल्या अधिवेशनात खासदारांनी 16 डिसेंबर पर्यंत व्यवस्थित भाग घेतला. पण त्यानंतर संसदेत झालेल्या घुसखोरीनंतर 142 खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेत गैरवर्तन करून टप्प्याटप्प्याने आपल्यावर निलंबन ओढवून घेतले, पण राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी हिवाळी अधिवेशन संपेपर्यंतच खासदारांचे निलंबन केले होते. काल 21 डिसेंबर रोजी संसदेचे हिवाळी अधिवेशन संपले. त्यामुळे आपोआपच 142 खासदारांचे निलंबनही रद्द झाले. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे सर्व खासदार बिनधोकपणे उपस्थित राहू शकणार आहेत.
पण तरी देखील INDI आघाडीतल्या नेत्यांची मोदी सरकार विरुद्ध आंदोलन करण्याची खुमखुमी संपली नाही. खासदारांच्या निलंबनाचा जो विषय अधिवेशन संपुष्टात आल्याबरोबरच संपला आहे, त्या निलंबनाच्या कालबाह्य विषयावर आज INDI आघाडीतल्या नेत्यांनी जंतरमंतरवर आंदोलन केले.
सोनिया फिरकल्या नाहीत, पवार हजर!!
अर्थात या आंदोलनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी हे पहिल्या फळीतले नेते सुरवातीला हजर राहिले नव्हते, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी नंतर जंतर-मंतरवर पोहोचले. सोनिया गांधी तर या आंदोलनाकडे फिरकल्याच नाहीत. काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार डी. राजा आदी नेते मात्र आधीपासून आंदोलनाला उपस्थित राहिले होते.
Parliament session ends, suspension of MPs also revoked; But the “stubbornness” of the leaders of the INDI front even today!!
महत्वाच्या बातम्या
- कोची रुग्णालयांमध्ये फ्लू सारख्या आजाराने ग्रस्त 30 टक्के लोक COVID-19 पॉझिटिव्ह
- देशात JN.1 व्हेरिएंटचे 21 नवीन रुग्ण; गोव्यात 19 केस; मे नंतर एका दिवसात सर्वाधिक 614 कोविड रुग्ण आढळले, केरळमध्ये 3 मृत्यू
- “हा” फोटो पाहा, बॉडी लँग्वेज “वाचा” आणि INDI आघाडीचे “उज्ज्वल भवितव्य” ओळखा!!
- पाकिस्तानच्या शेअर बाजारात ३२ वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण!