Parliament Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी Parliament Monsoon Session) कॉंग्रेसच्या संसदीय गटाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हे काम प्रभावी आणि सोयीस्कर करण्यासाठी दोन्ही सभागृहांत पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. यात त्यांनी नेत्यांच्या ज्येष्ठतेचा क्रम कायम ठेवला आहे. सोनिया गांधी यांनी अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेत पक्षाचे नेते म्हणून पुन्हा नियुक्त केले आहे, तर गौरव गोगोई यांची उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, के. सुरेश हे मुख्य सचेतक असतील, तर लोकसभेत रवनीतसिंग बिट्टू आणि मणिकम टागोर हे पक्षाचे व्हीप असतील. त्याचबरोबर शशी थरूर आणि मनीष तिवारी यांनाही या गटात समाविष्ट करण्यात आले आहे. Parliament Monsoon Session Adhir Ranjan will be LOp in Lok Sabha, read Details Congress CPC Decisions
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी (Parliament Monsoon Session) कॉंग्रेसच्या संसदीय गटाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हे काम प्रभावी आणि सोयीस्कर करण्यासाठी दोन्ही सभागृहांत पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. यात त्यांनी नेत्यांच्या ज्येष्ठतेचा क्रम कायम ठेवला आहे. सोनिया गांधी यांनी अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेत पक्षाचे नेते म्हणून पुन्हा नियुक्त केले आहे, तर गौरव गोगोई यांची उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, के. सुरेश हे मुख्य सचेतक असतील, तर लोकसभेत रवनीतसिंग बिट्टू आणि मणिकम टागोर हे पक्षाचे व्हीप असतील. त्याचबरोबर शशी थरूर आणि मनीष तिवारी यांनाही या गटात समाविष्ट करण्यात आले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्यसभेचे सभागृहनेते आणि आनंद शर्मा यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अंबिका सोनी, पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह आणि केसी वेणुगोपाल यांच्यासमवेत पक्षाने जयराम रमेश यांना राज्यसभेवर मुख्य सचेतक म्हणून नेमले आहे. सोनिया गांधी यांनी जारी केलेल्या दिशानिर्देशात असे म्हटले आहे की, सीपीपीचे अध्यक्ष म्हणून मी संसदेच्या दोन्ही सभागृहांत आमच्या पक्षाच्या प्रभावी कामकाजाची सोय व खात्री करण्यासाठी गटांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. हे गट सत्रादरम्यान दररोज आणि सत्रादरम्यानही भेटू शकतात.
मल्लिकार्जुन खर्गे संयुक्त बैठकीचे संयोजक
जोपर्यंत संसदेच्या मुद्द्यांचा प्रश्न आहे, आवश्यक असल्यास या सर्व गटांच्या संयुक्त बैठकादेखील बोलविल्या जाऊ शकतात. राज्यसभेचे नेते मल्लिकार्जुन खरगे हे संयुक्त बैठकीचे समन्वयक असतील. सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यापूर्वी रविवारी विरोधी पक्षनेत्यांची बैठक होणार आहे. ज्यामध्ये शेतकरी आंदोलन, खासगीकरण आणि देशद्रोहाच्या कायद्यांच्या कायदेशीरपणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीसह अनेक विषयांवर केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.
Parliament Monsoon Session Adhir Ranjan will be LOp in Lok Sabha, read Details Congress CPC Decisions
महत्त्वाच्या बातम्या
- News Click website Controversy : देशाविरुद्ध कट रचण्यासाठी न्यूज पोर्टलला थेट चीनमधून 38 कोटींची फंडिंग, ईडीने आवळला फास
- Mumbai Landslide : त्या ठिकाणच्या लोकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगितलं होतं… दुर्घटनेवर महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
- चेंबूर, विक्रोळीतील दुर्घटनेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार
- Mumbai Landslide : चेंबूर, विक्रोळीतील दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू; पीएम मोदींकडून शोक व्यक्त करत मदतीची घोषणा
- वाढदिवसाचा खर्च टाळून अपघाती निधन झालेल्या भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना मदत, बनकर कुटुंबाला एक लाखाचा धनादेश सुपूर्द