विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मणिपूरच्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावे म्हणून संपूर्ण अधिवेशनात संसद बंद पाडणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी एक वेगळीच तर्कट समोर केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरेदी यांनी राज्यसभेत राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगडच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकत नाही. त्यासाठी वेगळा फोरम उपलब्ध असल्याचे अजब तर्कट मांडले आहे. Parliament is not the forum to discuss Rajasthan, Chattisgarh and Maharashtra
दिल्ली सेवा नियमन विधेयक तसेच बाकीच्या मुद्द्यांवर चर्चा करताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारला जाब विचारणारे काही मुद्दे उपस्थित केले. मात्र त्याचवेळी काही सदस्यांनी राजस्थानातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. तिथे होत असलेल्या महिला अत्याचारांवर सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी जोरदार कटाक्ष केला. पण भाजपच्या सदस्यांना प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपच तर्कट मांडले.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, की राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगड इथले मुद्दे उपस्थित करायला संसद हा फोरम असू शकत नाही. त्यासाठी वेगळे फोरम उपलब्ध आहेत. त्या फोरमवर जाऊन सदस्यांनी चर्चा करावी. पण याच मल्लिकार्जुन खर्गे यांनी मणिपूर वर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत येऊन उत्तरे दिली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
गेले 15 दिवस मणिपूरच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि बाकीचे विरोधी पक्ष संसदेचे कामकाज स्थगित करायला भाग पाडत आहेत. वेगवेगळ्या विधेयकांवर चर्चा करण्याऐवजी गदारोळ करत आहेत, या मुद्द्याकडे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोयीस्करच्या दुर्लक्ष केले.
भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भूमिकेतील विसंगती समोर आणणारा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केला आहे.
Parliament is not the forum to discuss Rajasthan, Chattisgarh and Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- ड्रॅगनला दणका, केंद्र सरकारची लॅपटॉप-टॅब्लेट-पीसी आयातीवर बंदी; मेक इन इंडिया उत्पादनाला चालना मिळणार
- १७ वर्षीय डी.गुकेश बनला भारताचा अव्वल बुद्धिबळपटू! ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला टाकले पिछाडीवर
- साताराची कन्या अपूर्वा अलाटकर ठरली पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला लोकोपायलट!
- नूह मध्ये घुसखोर रोहिंग्यांच्या 200 बेकायदा झोपड्या बुलडोजर कारवाईत उद्ध्वस्त!!