• Download App
    सभागृह म्हणजे मंदिर, सदस्यांच्या गोंधळाने त्याचे पावित्र्य संपले, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यात अश्रू तरळले|Parliament is a temple, its sanctity was ruined by the confusion of the members, tears flowed in the eyes of Vice President Venkaiah Naidu

    सभागृह म्हणजे मंदिर, सदस्यांच्या गोंधळाने त्याचे पावित्र्य संपले, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यात अश्रू तरळले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मंदिरात गर्भगृह खूप महत्वाचे व पवित्र असते. लोकशाहीत सभागृह म्हणजे मंदिरच आहे. कृषी कायद्यांना विरोध करताना मंगळवारी सभागृहात काही सदस्यांनी जो गोंधळ घातला, असंसदीय कृत्य केले, त्यामुळे सभागृहाचे पावित्र्य संपले, अशा शब्दांत भावना व्यक्त करताना राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना दाटून आले, त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.Parliament is a temple, its sanctity was ruined by the confusion of the members, tears flowed in the eyes of Vice President Venkaiah Naidu

    नायडू म्हणाले, मंगळवारी सभागृहात विरोधाच्या सर्व मर्यादा पायदळी तुडवण्यात आल्या. एक सदस्य महासचिवांसमोरील टेबलवर चढला, दुसऱ्याने नियमांचे पुस्तक फेकले, अन्य सदस्य या टेबलवरच बसून राहिले, याचा उल्लेख करत नायडू म्हणाले की, या सदस्यांनी आपल्या वागणुकीने सभागृहाची प्रतिष्ठा मातीमोल केली. या सदस्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल.



    पावसाळी अधिवेशनात काही सदस्यांनी सभागृहात अभूतपूर्व असा गोंधळ घातला. तुम्ही सभागृहात कोणत्याही मुद्यांवर चर्चा करू शकता, तुमचे मत वेगळे राहू शकते, पण तुम्ही ज्या पद्धतीने गोंधळ घातला, तो प्रकार दु:खदायक आहे, असे सांगून नायडू म्हणाले,

    नाराजी व्यक्त करत असतानाही सभागृहात विरोधी सदस्यांचा गोंधळ सुरूच होता.आसनावरून जे सांगितले जात आहे, ते तुम्हाला ऐकावेच लागेल.सभागृहात गोंधळ घालणाºया सदस्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून गृहमंत्री अमित शाह, सभागृहाचे नेते पीयष गोयल तसेच भाजपा खासदारांनी नायडू यांची भेट घेतली.

    Parliament is a temple, its sanctity was ruined by the confusion of the members, tears flowed in the eyes of Vice President Venkaiah Naidu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!