• Download App
    संसदेतले घुसखोर दाखवायला गेले बेरोजगारी; प्रत्यक्षात निघाले काँग्रेसी - डावे आंदोलनजीवी!! Parliament intruders went to show unemployment; In reality, the Congressmen turned out to be left-wing agitators

    संसदेतले घुसखोर दाखवायला गेले बेरोजगारी; प्रत्यक्षात निघाले काँग्रेसी – डावे आंदोलनजीवी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दाखवायला गेले बेरोजगारी आणि प्रत्यक्षात निघाले काँग्रेसी – डावे आंदोनजीवी!!, असा संसदेत घुसखोरी करणाऱ्या 6 जणांचा भांडाफोड झाला आहे. Parliament intruders went to show unemployment; In reality, the Congressmen turned out to be left-wing agitators

    या 6 जणांची सोशल मीडियावर ओळख झाली. एक गुरुग्राम मध्ये एकत्र आले. तिथे त्यांनी कारस्थान रचले. दोघे घोषणाबाजी करत संसदेबाहेर घुटमळले. दोघे संसदेत आत मध्ये गेले. त्यांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या मुख्य सभागृहात उड्या टाकल्या, स्मोक कॅन्डल फोडल्या आणि नंतर पकडले गेले. या सहा जणांच्या चौकशी आणि तपासात ते काँग्रेसी – डावे आंदोलनजीवी निघाल्याचे उघड्यावर आले.

    यातली हरियाणातील जींदची नीलम आझाद ही बीए, एमए, सीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेली बेरोजगार असल्याचे सांगितले जात होते, पण प्रत्यक्षात ती शेतकरी आंदोलनातली आंदोलनजीवी निघाली. हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला.



    कर्नाटकातला मनोरंजन हा रिक्षाचालक असल्याचे सांगितले गेले, पण त्याच्या घरात सापडलेल्या पुस्तकांमध्ये बहुतांश पुस्तके डाव्या विचारसरणीची आढळली. तो फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा यांच्या प्रेरणेतून “क्रांती” करायला निघाला होता.

    लातूरचा अनमोल उर्फ अमोल शिंदे हा पोलीस भरतीसाठी घरातून निघून गेला होता. आपले आई वडील शेतावर मजुरी करतात याचे भानही त्याला उरले नव्हते.

    यांचा म्होरक्या सागर शर्मा हा लखनऊतला बिनकामाचा मुलगा आहे. तो काय करतो??, कुठे काम करतो??, वगैरे माहिती देखील त्याच्या घरच्यांना नाही. त्याने संसदेत घुसखोरी केल्याचा त्याच्या कुटुंबीयांनाच धक्का बसला.

    वर उल्लेख केलेले चौघे गुरुग्राम मध्ये विवेक शर्मा आणि राखी शर्मा यांच्या घरी भेटले. तिथे त्यांनी कारस्थान रचले. चौघांनी हे कारस्थान प्रत्यक्षात अंमलात आणले. हे सगळे दाखवायला गेले होते बेरोजगारी, पण प्रत्यक्षात ठरले आंदोलनजीवी!!, असे या सगळ्यांच्या तपासातून बाहेर आले. पोलिसांनी आपला हिसका दाखवताच सगळेजण घडाघडा बोलू लागले. यातून मोठ्या कारस्थानाचा सुगावा पोलिसांना लागला आहे.

    Parliament intruders went to show unemployment; In reality, the Congressmen turned out to be left-wing agitators

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Income Tax : ₹10 लाखांपर्यंत रोख व्यवहारांवर पॅन आवश्यक नाही; हॉटेल बिलाची मर्यादाही ₹1 लाख; 1 एप्रिलपासून लागू होतील नवीन नियम

    Yogi Adityanath : योगी म्हणाले- बाबरी ढाचा प्रलयाच्या दिवसापर्यंत बनणार नाही; जो कायदा मोडेल त्याला नरक मिळेल

    Manipur Violence : मणिपूरच्या उखरुलमध्ये पाच दिवसांसाठी इंटरनेट बंद; दंगलखोरांनी 25 घरे आणि चार सरकारी निवासस्थाने जाळली