• Download App
    Paris Olympics swapnil kusale bronze स्वप्नील कुसाळेची बाँझ पदकाला गवसणी!!

    Paris Olympics : कोल्हापूरचा वाजला पॅरिस मध्ये डंका; स्वप्नील कुसाळेची बाँझ पदकाला गवसणी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांच्या 3 ब्राँझ पदकांच्या बातमीनंतर आज पॅरिस मधून पुन्हा आनंदाची बातमी आली. कोल्हापूरचा डंका पॅरिस मध्ये वाजला.
    महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकलं. त्याचे गुण 463.6 होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आदी नेत्यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले. Paris Olympics swapnil kusale bronze

    भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरे ब्राँझ पदक आहे. स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावातील असून तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो आहे. आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आहे.

    स्वप्नीलने पॅरिसच्या धरतीवर चमक दाखवली. स्वप्नीलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच भारी आहे. अभिनव बिंद्राला 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलने 12वीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला. 2009 मध्ये 14व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले.

    स्वप्नील कुसाळे मध्य रेल्वेत कार्यरत-

    स्वप्नील कुसाळे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे. ज्याप्रमाणे एमएस धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. भारताचा हा नेमबाज महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित आहे. स्वप्नील म्हणतो की त्याने एमएस धोनीचा बायोपिक अनेकदा पाहिला आहे आणि धोनीच्या कामगिरीपासून मी प्रेरणा घेतली आहे.

    Paris Olympics swapnil kusale bronze

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार