• Download App
    Paris Olympic in Lakshya Sen लक्ष्य सेनचा रजनीकांत शॉट; जगातल्या तिसऱ्या नंबरच्या खेळाडूवर केली मात!!

    Paris Olympic in Lakshya Sen : लक्ष्य सेनचा रजनीकांत शॉट; जगातल्या तिसऱ्या नंबरच्या खेळाडूवर केली मात!!

    Paris Olympic in Lakshya Sen

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताच्या लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये अनपेक्षित विजय साकारला. पण लक्ष्य सेनच्या या विजयापेक्षा त्याच्या एका अफलातून फटक्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. लोकांनी त्या शॉटला रजनीकांत शॉट नाव दिले आहे. सेनने मारलेल्या या फटक्याचा व्हिडिओ सध्याच्या घडीला जगभरात चांगलाच व्हायरल आहे.  This reflex shot by Lakshya Sen is Peak beauty of his talent.

    लक्ष्य सेनचा सामना हा जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या जोनाथन ख्रिस्तीबरोबर झाला. त्यामुळे बऱ्याच जणांना सेन जिंकेल, असे वाटत नव्हते. सेनला सुरुवातही चांगली करता आली नव्हती. कारण पहिल्या गेममध्ये सेन हा २-८ अशा पिछाडीवर होता. त्यामुळे सेन आता पहिला गेम गमावणार, असे वाटत होते. पण त्यानंतर मात्र सेनने सामन्यात दमदार पुनरागमन केले.

    सेनने दुधारी तलवारीसारखा खेळ केला. एकिकडे त्याने आक्रमण केले, पण दुसरीकडे त्याने उत्तम बचावही केला. या रणनितीचा त्याला चांगलाच फायदा झाला. कारण सेनने पहिल्याच गेममध्ये जोनाथशी बरोबरी केली. त्यावेळी सेनचा आत्मविश्वास दुणावला. कारण मोठी पिछाडी भरून काढत त्याने बरोबरी साधली होती. सेनने त्यानंतर १९-१८ अशी दमदार आघाडी घेतली होती. त्यावेळी हा फटका सेनकडून पाहायला मिळाला.

    सेन उजव्य हाताने खेळत होता. त्यावेळी जोनाथनने हा फटका त्याच्या डाव्या बाजूला मारला. हा फटका एवढ्या डाव्या बाजूला होता की, तो उजव्या हाताने मारणे शक्य दिसत नव्हते. पण त्याचवेळी सेनचा रजनीकांत शॉट यावेळी पाहायला मिळाला. सेनने यावेळी रॅकेट आपल्या पाठिच्या बाजूला घेतले आणि हा अफलातून शॉट मारला. हा फटका पाहून सर्वांनाच धक्का बसला आणि सेनने हा पॉइंटही जिंकला. त्यामुळे यावेळी सर्वात जास्त या फटक्याची चर्चा सुरु झाली आहे.

    सेनने पहिला गेम २१-१८ असा जिंकला. त्यामुळे आता दुसऱ्या गेममध्ये सेन कशी कामगिरी करतो, यावर त्याचा विजय अवलंबून होता. दुसऱ्या गेममध्ये सेनचा खेळ अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यावेळी सेनने दुसऱ्या गेममध्ये मोठी आघाडी घेतली. दुसरा गेम सेनने दमदार आघाडीसह २१-१२ असा सहजपणे जिंकला आणि सामना खिशात घातला.

    लक्ष्य सेनने आतापर्यंत दमदार विजय मिळवले आहेत. पण त्याचा हा विजय सर्वात महत्वाचा आहे. कारण त्याने जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला पराभूत केले आहे. सेनचा हा विजय मोठा आहेच, पण त्यापेक्षा जगभरात त्याच्या या रजनीकांत शॉटची सर्वाधिक चर्चा सुरु झाली आहे.

    Paris Olympic in Lakshya Sen

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र