विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोरोनापासून बचाव करणारी लस जोपर्यंत दिली जात नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवण्याबाबत ४८ टक्के पालक उत्सुक नसल्याचे नव्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणात देशभरातील ३६१ जिल्ह्यातील ३२ हजार पालक सहभागी झाले होते.Parents not interest to send children in school
या सर्वेक्षणात ४७ टक्के पालक हे पहिल्या श्रेणीतील जिल्ह्यातील होते. तर दुसऱ्या श्रेणीतील २७ टक्के आणि तीन, चार श्रेणी आणि ग्रामीण जिल्ह्यातील २६ टक्के पालकांचा समावेश होता.
आपल्या जिल्ह्यातील कोरोना संसर्ग शून्यावर आल्यास पाल्यांना शाळेत पाठवण्यास ३० टक्के पालक तयार असल्याचे निष्पन्न झाले आहे. ऑनलाइन सर्वेक्षणातून काही निष्कर्ष समोर आले आहेत. येत्या काळात शाळा सुरू होत असतील तर मुलांचे लसीकरण हा सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे.
जोपर्यंत मुलांना लस दिली जात नाही, तोपर्यंत पाल्यांना शाळेत पाठवणार नसल्याचे ४८ टक्के पालकांचे मत आहे. त्याचवेळी शाळा सुरू झाल्यानंतर २१ टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत.
देशभरात कोरोनासंसर्गामुळे मागील वर्षाच्या मार्च महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यानंतर ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले. कोरोनाची दुसरी लाट कमी झाल्यानंतर गुजरात, महाराष्ट्र, हरियाना, मध्य प्रदेश, बिहारमध्ये काही प्रमाणात शाळा सुरू झाल्या तर राजस्थान, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेशात शाळा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यांपासून सुरू होत आहेत.
Parents not interest to send children in school
महत्त्वाच्या बातम्या
- विश्वभारती विद्यापीठाला उच्च न्यायालयाने फटकारले, मुख्यमंत्री निधीसाठी कर्मचाऱ्यांच्या परवनगीशिवाय कापला एक दिवसाचा पगार
- गुंतवणूकगुरू राकेश झुनझनवाला सुरू करणार नवीन एअरलाईन्स सुरू करणार, सर्वात कमी दर ठेऊन करणार भारतीय विमानसेवेत क्रांती
- इस्लामी दहशतवादामुळे घर सोडावे लागलेल्या काश्मीरी पंडितांचे स्वगृही जाण्याचे स्वप्न होणार पूर्ण, पंतप्रधान विकास पॅकेजअंतर्गत २,७४४ फ्लॅटस उभारणार
- नारायण राणेंवर टीका करताना भास्कर जाधव बरळले, म्हणाले असली मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी येऊ नयेत