• Download App
    पंकजा मुंडेंनी चित्रपटाचे केले कौतुक, अक्षय कुमारने मानले आभार! 'रक्षाबंधन'मध्ये सामाजिक वास्तवाचे चित्रण|Pankaja Munde praised the film, Akshay Kumar thanked! A depiction of social reality in 'Rakshabandhan'

    पंकजा मुंडेंनी चित्रपटाचे केले कौतुक, अक्षय कुमारने मानले आभार! ‘रक्षाबंधन’मध्ये सामाजिक वास्तवाचे चित्रण

    प्रतिनिधी

    मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे एका मराठी मनोरंजन वाहिनीवर दिसणार आहेत. त्यांची मुलाखत आज आणि उद्या झी मराठी एंटरटेनमेंटच्या बस बाई बस या कार्यक्रमात दाखवली जात आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारबद्दल एक ट्विट केले आहे. यावर अक्षय कुमारनेही रिप्लाय दिला आहे. अक्षयने रिप्लाय देऊन पंकजाताईंचे आभारही मानले आहेत.Pankaja Munde praised the film, Akshay Kumar thanked! A depiction of social reality in ‘Rakshabandhan’

    पंकजा मुंडे आणि अक्षय कुमार यांच्यातील या संवादाची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातच नव्हे, तर मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातही जोरदार चर्चा आहे.



    पंकजा मुंडे यांनी ट्विट करत अक्षय कुमारचे कौतुक केले

    पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, आज रक्षा बंधन मी आणि माझ्या बहिणी यांनी मुलांच्या समवेत ?”रक्षा बंधन”सिनेमा पाहीला.मला खूप भावला.समाजात अजूनही मुली व त्यांचे विवाह कठीण आहेत कारण त्यांची किम्मत मोजावी लागते.fridge,TV,गाड़ी,status या गोष्टींसाठी आपल्या लाडकी चे प्राण ही गमवावे लागतात किती दुर्दैवी आहे हे! मला वाटते #RakshaBandhan सिनेमात संकल्प घेतला तसा आपण घेऊ शकलो पाहिजे.कठीणआहे,आपणच दडपणात चुकीच्या रीति पाळतो.नाते फायदा-तोटा यात बसवत असतो.जरूर आपण ही परिवाराच्या सोबत हा सिनेमा पहावा,काहीतरी सुरुवात करावी नव्या दिशा नव्या निश्चयाची !good movie great message @akshaykumar sir”

    अक्षय कुमारचे उत्तर आले, म्हणाला- धन्यवाद

    या ट्विटला रिप्लाय देताना अभिनेता अक्षय कुमारने पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत. या सिनेमाद्वारे आपण समाजात 5 टक्केही बदल घडवून आणू शकलो, तरी ते आपल्यासाठी खूप मोठं यश असेल, असं अक्षय कुमारने म्हटलं आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात सांगितलेल्या गोष्टी खूप गाजत आहेत. याच मुलाखतीत त्यांनी आपल्या पक्षात दुर्लक्ष होत असल्याची खंतही व्यक्त केली आहे.

    Pankaja Munde praised the film, Akshay Kumar thanked! A depiction of social reality in ‘Rakshabandhan’

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!