• Download App
    पंकज त्रिपाठीचा पहिला अटल लूक जारी; सिनेमा पुढच्या वर्षी रुपेरी पडद्यावर Pankaj Tripathi's First Atal Look Released; The movie will hit the silver screen next year

    25 डिसेंबर 2022 : पंकज त्रिपाठीचा पहिला अटल लूक जारी; सिनेमा पुढच्या वर्षी रुपेरी पडद्यावर

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. Pankaj Tripathi’s First Atal Look Released; The movie will hit the silver screen next year

    अभिनेता पंकज त्रिपाठी याने त्याच्या अटल सिनेमाचा पहिला लूक जारी केला आहे. विनोद भानुशाली आणि संदीप सिंह यांची निर्मिती असलेला मै अटल हूँ हा सिनेमा पुढच्या वर्षी 25 डिसेंबरला रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी या सिनेमात अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारत आहे.

    या भूमिकेचा पहिला लूक पंकज त्रिपाठीने आज अटलजींच्या जयंतीनिमित्त आपल्या सोशल मीडिया हँडलवरून जारी केला आहे. अटलजींचे व्यक्तिमत्व साकारण्यासाठी मला भरपूर संयमाने काम करावे लागेल. संयम शिकावा लागेल. ते काम मी चिकाटीने करेन. मला आशा आहे की अटलजींच्या लूक मध्ये मी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेन, असा आशावाद पंकज त्रिपाठी याने व्यक्त केला आहे.

    आज सकाळी अटलजींच्या समाधीस्थळी जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीश धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली.

    Pankaj Tripathi’s First Atal Look Released; The movie will hit the silver screen next year

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’