विशेष प्रतिनिधी
लखनौ : मेरठमधील मोदीपुरमच्या दुल्हिदा गावातून पल्लवपुरमच्या क्यू पॉकेटच्या ७२ क्रमांकाच्या घरात शुक्रवारी सकाळी बिबट्याने प्रवेश केला. त्यामुळे कुटुंबात खळबळ उडाली होती. गेल्या एक तासापासून हे कुटुंब खोलीत कैद आहे. माहिती मिळताच पोलिस आणि जमाव जमा झाला. Panic as leopards enter the house
घरमालक स्वप्नील यांनी सांगितले की, मोठा आवाज ऐकून त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला. यानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर येण्यास मनाई केली. त्यांच्याशिवाय त्यांची पत्नी प्रीती शर्मा, आई आभा शर्मा, वहिनी आणि दोन मुले घरात बंद आहेत.
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती वनविभागाला दिली आहे. तासाभरानंतरही पथक घटनास्थळी पोहोचले नाही. बिबट्या पहिल्यांदा पळताना डॉक्टर राजकुमार चौधरी यांना दिसला. त्याचा आवाज ऐकून गर्दी जमली आणि बिबट्या स्वप्नीलच्या घरात घुसला.
Panic as leopards enter the house
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीयांना खार्किव्ह सोडण्यासाठी रशियाने युध्द थांबविल्याच्या वृत्ताचे परराष्ट्र मंत्रालयाकडून खंडन
- गेल्या सत्तर वर्षांत वैद्यकीय सेवा मजबूत झाली असती तर तुम्हाला युक्रेनला शिकण्यासाठी जावेच लागले नसते, पंतप्रधानांनी साधला युक्रेनहून आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद
- यू ट्यूबवरून भारतीयांना कमाविले ६८०० कोटी रुपये, पाच वर्षांत युट्यूबमुळे मिळाल्या पावणेसात लाख नोकऱ्या
- फ्रान्समध्ये न्यायालयात महिला वकिलांना हिजाब परिधान करण्यास बंदी