वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे भारताविरोधात चीन आणि पाकिस्तान एकत्र आले आहेत. सीमेवर त्यांच्या घातक कारवाया वाढल्या आहेत पण मोदी सरकारची चीनला प्रत्युत्तर देण्याची हिम्मत नाही, असे टीकास्त्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील धन्यवाद प्रस्तावावर सोडले होते.Pandit Nehru’s foreign policy to China;
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर आज देशातून सर्व बाजूंनी टीकास्त्र सोडले जात असून त्यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांचा देखील समावेश आहे. नटवर सिंह यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले असून सरकार तर्फे केंद्र सरकारतर्फे त्यांना कठोर शब्दात कोणी प्रत्युत्तर कसे दिले नाही? असा सवाल केला आहे.
नटवर सिंह म्हणाले, की वास्तविक पाहता भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचेच परराष्ट्र धोरण चीन धार्जिणे होते. त्यांनीच जम्मू-काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेला. वास्तविक हा प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न होता आणि तो चर्चेद्वारे सोडविण्याची भूमिका त्यांनी त्यावेळी घ्यायला हवी होती. परंतु, नेहरूंनी संयुक्त राष्ट्र संघात जम्मू-काश्मीरचा विषय नेला. चीन वर देखील नेहरूंनी अतिरिक्त विश्वास ठेवला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे स्थायी सदस्यत्व भारताला मिळणे अपेक्षित असताना पंडित नेहरूंनी ते चीनला बहाल केले, याकडे नटवर सिंह यांनी लक्ष वेधले आहे.
– राजनाथ सिंहांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर
राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा सर्व मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील समाचार घेतला आहे. हिमालयाच्या पर्वत रांगांमधील शाक्सगाम खोरे हे पंडित नेहरूंनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात चीनला देऊन टाकले हे राहुल गांधी विसरले आहेत, असे राजनाथ सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांनी त्या पुढे जाऊन दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर देखील ताशेरे ओढले. चीन जेव्हा काराकोरम मध्ये महामार्ग बनवत होता तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यांनी मला त्यावेळी अजिबात विरोध केला नव्हता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
काँग्रेसच्या नेत्यांना जनतेची दिशाभूल करण्याची फार जुनी सवय आहे. खोटी आणि चुकीची माहिती दडपून सांगणे हे त्यांच्या रक्तात भिनले आहे, अशा शेलक्या शब्दांत मध्ये राजनाथसिंह यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे वाभाडे काढले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला असून राहुल गांधींचे वक्तव्य ऐतिहासिकदृष्ट्या चूक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Pandit Nehru’s foreign policy to China;
महत्त्वाच्या बातम्या
- BMC Budget : बीएमसी आयुक्तांनी सादर केला ४५,९४०.७८ कोटींचा अर्थसंकल्प, डिजिटल जाहिरातीतून कमाईची योजना
- आर्ट फिल्म्सची नॉन ग्लॅमरस नायिका दीप्ती नवल; आज 70 वा वाढदिवस
- बीएमसीचा ३३७० कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प सादर, मुंबईत दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा बांधण्याची तरतूद
- आम आदमी पार्टीचे काँग्रेसच्या पुढचे पाऊल; शपथेनंतर उमेदवारांकडून घेतली कायदेशीर प्रतिज्ञापत्रावर सही!!