विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इनकम टॅक्स पोर्टलमधील अडचणी सोडविण्यात आलेल्या अपयशावरून आरएसएसचे मुखपत्र असलेल्या पांचजन्य साप्ताहिकाने इन्फोसिस कंपनीवर बोचरी टीका केली आहे. साख और आघात नावाने कव्हर स्टोरी करण्यात आली असून उंची दुकान, फिका पकवान अशी टीका करण्यात आली आहे. देशविरोधी शक्ती भारताच्या अर्थव्यवस्थेला हादरे देण्याचा प्रयत्न करत आहेत असेही म्हटले आहे.Panchjanya criticizes Infosys for being anti-national
इन्फोसिस कंपनीकडे वस्तू आणि सेवा कर त्याचबरोबर इनकम टॅक्स पोर्टलचे काम देण्यात आले आहे. मात्र, या पोर्टलमध्ये सातत्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे करदात्यांना मनस्ताप होत आहे. यावरूनच पांचजन्य मासिकाने इन्फोसिसला धारेवर धरले आहे. त्यामध्ये इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा फोटोही वापरण्यात आला असून त्याखाली साख और आघात असे लिहिले आहे.
इन्फोसिसने हा प्रकल्प अत्यंत हलगर्जीपणे हाताळला. उंची दुकान, फिका पकवान अशी त्यांची अवस्ता आहे. देशविरोधी शक्तींद्वारे भारताचे आर्थिक हितसंबंध दुखावण्याचा प्रयत्न हो तअसल्याचे म्हटले आहे. इन्फोसिसने विकसित केलेल्या जीएसटी आणि इन्कम टॅक्स रिटर्न या दोन्ही पोर्टलमधील त्रुटींमुळे, देशाच्या अर्थव्यवस्थेवर करदात्यांच्या विश्वासाला धक्का पोहोचला आहे.
इन्फोसिसच्या माध्यमातून कोणतीही देशद्रोही शक्ती भारताचे आर्थिक हितसंबंध दुखावण्याचा प्रयत्न करत आहे का?असा सवालही केला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, या लेखाद्वारे सरकार आपल्या चुकीचे खापर इन्फोसिसवर फोडण्याचा प्रयत्न करत आहे. इन्फोसिससारख्या आयटी कंपन्यांनी देशाचा कायापालट केला आहे. त्यामुळे या लेखाचा निषेध करायला हवे.
ई-फाइलिंग पोर्टलमधील समस्या सोडविण्यास अपयश आल्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिस कंपनीचे एमडी आणि सीईओ सलील पारेख यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पोर्टलवरील करदात्यांना भेडसावणाºया सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी इन्फोसिसला 15 सप्टेंबरची मुदत दिली आहे. अर्थ मंत्रालयाच्या मते, पारेख यांनी आश्वासन दिले की पोर्टलवरील करदात्यांच्या समस्या सोडविण्यासाठी इन्फोसिस वेगाने काम करत आहे.
Panchjanya criticizes Infosys for being anti-national
महत्त्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोगा आला ममतादीदींच्या मदतीला धावून, भवानीनगरची पोटनिवडणूक होणार ३० सप्टेंबरला
- पंतप्रधान मोदी लवकरच अमेरिकेला भेट देणार, आमसेभेतही भाषण होण्याची शक्यता
- हिंदू असो की मुसलमान सर्वांसाठी “एक कुटुंब, एक मूल”, हाच नियम हवा; रामदास आठवले यांची आग्रही मागणी
- करेक्टच्या पलिकडे करेक्ट कार्यक्रम करीन; राजू शेट्टींचे शरद पवारांना प्रत्युत्तर