• Download App
    ममतांच्या बंगालमध्ये पालघरची पुनरावृत्ती 3 साधूंना बेदम मारहाण; 12 जणांना अटक पण मास्टर माईंड शेख अन्वर फरार!! Palghar repeats in Mamta's Bengal 3 Sadhus brutally beaten

    ममतांच्या बंगालमध्ये पालघरची पुनरावृत्ती 3 साधूंना बेदम मारहाण; 12 जणांना अटक पण मास्टर माईंड शेख अन्वर फरार!!

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या राजवटीत पुरुलियामध्ये पालघरची पुनरावृत्ती घडली. पालघर मध्ये जशी जमावाने साधूंना मारहाण केली होती, तशाच प्रकारे पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात जमावाने 3 साधूंना मारहाण केली. याचा व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत पश्चिम बंगाल सरकारने या प्रकरणाची दखल घेतली नाही, पण नंतर दखल घेऊन भाजपवरच त्याचे खापर फोडले. पुरुलिया जिल्ह्याच्या प्रशासनाने साधू मारहाण प्रकरणात 12 जणांना अटक केली, पण या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माईंड शेख अन्वर मात्र फरार आहे. Palghar repeats in Mamta’s Bengal 3 Sadhus brutally beaten

    मकर संक्रांती पर्वा निमित्त गंगासागरात स्नानासाठी निघालेले 3 साधू रस्ता चुकले. त्यांनी काही जणांना रस्ता विचारला त्यावेळी तिथे असलेल्या 3 मुलींनी आरडाओरडा केला. त्यामुळे हे साधू अपहरणकर्ते आहेत असे समजून जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. या जमावात प्रामुख्याने ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसचेस्थानिक कार्यकर्ते सामील होते. या सगळ्या महाराणीचा मास्टर माईंड शेख अन्वर काँग्रेसचा स्थानिक नेता आहे.

    या प्रकरणाचा पुरुलिया जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई केली असून 12 जणांना अटक करून कोर्टासमोर हजर केले त्यांना कोर्टाने 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मात्र या प्रकरणातला मास्टर माईंड शेख अन्वर मात्र फरारच आहे.

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राज्यात शाहजहां शेख सारख्या दहशतवाद्यांना संरक्षण मिळत असं त्यांनी म्हटलं आहे. बंगालमध्ये खुलेआम साधुंच्या हत्येचा प्रयत्न होतोय. पश्चिम बंगालमध्ये हिंदू असणे अपराध आहे, अशी टीका भाजपच्या आई विषयीचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली. त्यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओच आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केला.

    संतप्त जमाव भगवा कपडे परिधान केलेल्या साधूंचे केस ओढत आहे. साधूंना निर्वस्त्र करुन लाठया, काठ्यांनी मारहाण केली जात आहे. साधू स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतच ते दया याचनाही करत आहेत. पण संतप्त जमाव काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीय. त्यांच्याकडून मारहाण सुरु आहे. पीडित साधूसोबत भगवे कपडे घातलेला आणखी एक व्यक्ती व्हिडिओमध्ये दिसतो आहे.

    पालघरमध्ये काय घडले होते?

    16 एप्रिल 2020 रोजी 72 वर्षीय संत महाराज कल्पवृक्ष गिरी आणि 35 वर्षाचे सुशील गिरी महाराज यांचा संतप्त जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. दोन्ही साधू आपल्या गुरुच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी मुंबईवरुन सूरतला चालले होते. दोन्ही साधूंवर मुले चोरीचा आरोप करत जमावाने त्यांची हत्या केली होती. असाच प्रकार पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात घडला.

    Palghar repeats in Mamta’s Bengal 3 Sadhus brutally beaten

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र