विशेष प्रतिनिधि
इस्लामाबाद : चहुबाजूंनी संकटाने घेरलेल्या पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पेट्रोलपासून पिठापर्यंत तीव्र टंचाईचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी आता दिवाळखोरीशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही. Pakistan’s bankruptcy now certain, no consensus on IMF relief package
पाकिस्तानसाठी एक शेवटची आशा म्हणजे IMF कडून दिलासा होता, पण ती आशाही आता संपल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवडाभरापासून दोन्ही बाजूंनी मदत पॅकेजसाठी सुरू असलेली चर्चा काल कोणत्याही निर्णयाशिवाय संपली.
पाकिस्तानी मीडियात कंगाल पाकिस्तानी नेत्यांची निंदा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती!
पाकिस्तानी माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांच्यात कर्मचारी स्तरावर 1.1 अब्ज डॉलरच्या मदत पॅकेजसाठी कोणताही करार झालेला नाही. पाकिस्तानला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी हे पॅकेज अत्यंत महत्त्वाचे आहे. 10 दिवसांच्या चर्चेनंतरही दोन्ही पक्षांमध्ये पॅकेजबाबत कोणताही करार होऊ शकला नाही.
वॉशिंग्टनस्थित आयएमएफने सांगितले की, येत्या काही दिवसांत व्हर्च्युअल माध्यमातून चर्चा सुरू राहील. पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा तीन अब्ज डॉलरपेक्षा कमी राहिला आहे. आर्थिक मंदी टाळण्यासाठी, सध्या आर्थिक मदतीची आणि IMF कडून मदत पॅकेजची नितांत गरज आहे. नववे पुनरावलोकन सध्या प्रलंबित आहे आणि ते यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर, पुढील टप्प्यात 1.1 अब्ज डॉलर्सचे कर्ज जारी केले जाईल.
Pakistan’s bankruptcy now certain, no consensus on IMF relief package
महत्वाच्या बातम्या