नाशिक : भारताने यशस्वी केलेल्या ऑपरेशन सिंदूरला तोंड देताना पाकिस्तानचे प्रत्यक्ष नाकी नऊ आलेत. कारण त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम भारतीय हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाली. त्यामुळे पाकिस्तानने जम्मू कश्मीर आणि पंजाब मधल्या अनेक ठिकाणांवर 50 ते 60 ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तुफानी गोळीबार करून नागरी वस्त्यांचे नुकसान केले. परंतु पाकिस्तानने प्रत्यक्ष सशस्त्र हल्ल्यांपेक्षा भारतावर फेक न्युजचे हल्ले जास्त केले. भारतीय सैन्य दलाने या दोन्ही हल्ल्यांना ताबडतोब चोख प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानचे सगळे प्रयत्न हाणून पाडले.
पाकिस्तानने जम्मू, उधमपूर, पठाणकोट, राजस्थानातील जैसलमेर इथे ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले. त्यामध्ये पाकिस्तानने सर्वसाधारण 50 ते 60 च्या दरम्यान ड्रोन आणि मिसाइल्स वापरली. परंतु, भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने प्रत्येक ठिकाणी ड्रोन्स आणि मिसाईल्स पाडून हे हल्ले नाकाम केले. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराने जम्मू परिसरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तुफान गोळीबार करून भारतातल्या नागरी वस्त्यांचे नुकसान केले. जम्मू काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी या बातमीची पुष्टी केली.
पण त्याचवेळी भारत आपला प्रत्येकाला नाकाम ठरवतोय हे पाहून पाकिस्तानी सैन्य दलाने भारतावर वेगवेगळ्या मार्गांनी फेक न्युजचा हल्ला केला. पाकिस्तानी सैन्य दलाच्या हल्ल्यापुढे भारतीय सैन्यदल निष्प्रभ ठरत असल्याचे दावे करून वेगवेगळ्या फेक न्यूजचा भारतावर मारा केला. असंख्य फेक व्हिडिओ व्हायरल केले. भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याला घाबरून देशातले सगळे एअरपोर्ट बंद केले, तिथे सर्वसामान्य प्रवाशांना बंदी घातली, अशी फेक न्युज चालवली. परंतु भारतीय नागरी हवाई मंत्रालयाने पाकिस्तानचा हा नॅरेटिव्ह पूर्ण उद्ध्वस्त केला. भारताने उत्तर भारतातील फक्त 25 विमानतळावरील नागरी सेवा तात्पुरती स्थगित केली आहे त्यापलीकडे कुठलीही विमानतळ बंद केलेले नाहीत, असे नागरी हवाई मंत्रालयाने स्पष्ट केले.
त्यानंतर पाकिस्तानने पठाणकोट आणि राजौरी मध्ये भारतीय लष्करी तळांवर फिदायिनी हल्ले झाल्याचे व्हिडिओ व्हायरल केले. प्रत्यक्षात तसे कुठलेही हल्ले झालेच नाहीत. भारतीय सैन्य दलाने ताबडतोब तसा खुलासा करून ती फेक न्यूज असल्याचे सांगितले.
त्या पाठोपाठ पाकिस्तानने गुजरात मधला हाजीरा एअरपोर्ट, जम्मू एअरबेस, जालंधर मधील लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याच्या फेक न्युज पसरविल्या. त्या फेक न्युज खऱ्या वाटाव्यात म्हणून पाकिस्तानी लष्कराने तिथले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. प्रत्यक्षात ते सगळे फोटो आणि व्हिडिओ 2022 मधल्या लेबानन मधल्या युद्धाचे आणि 2021 मधल्या काबुल मधल्या स्फोटाचे असल्याचे सिद्ध झाले. भारतीय सैन्य दलाने वेळीच त्याचा स्पष्ट खुलासा करून पाकिस्तानचा पर्दाफाश केला.
भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानच्या या कुरापतीला चोख प्रत्युत्तर दिले. परंतु भारतीय सैन्य दलाने कराची, लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा इथे हल्ला केला, या बातम्यांची अजून तरी पुष्टी केलेली नाही. त्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युरोपियन युनियन मधल्या अनेक देशांची संपर्क साधून भारताच्या वेगवेगळ्या प्रतिहल्ल्यांची सविस्तर माहिती दिली.
Pakistan’s attack of more fack news and fake videos Operation sindoor
महत्वाच्या बातम्या
- भारताने 13 देशांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली, या ४ मुद्द्यांवर होता फोकस
- Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये जवानांनी २२ नक्षलवाद्यांना केले ठार, १८ जणांचे मृतदेह सापडले
- Singer Adnan Sami : गायक अदनान सामीचा खुलासा- पाकिस्तानी मुले त्यांच्या सैन्याचा तिरस्कार करतात; देश उद्ध्वस्त केल्याचा आरोप
- सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण