विशेष प्रतिनिधी
सहारनपूर : भारताची सून म्हणून सीमेपलीकडून आलेल्या शमीम परवीन या महिलेने लोकशाहीच्या महान उत्सवात सहभाग घेतला. भारताच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी तिने पहिले मतदान केले, तब्बल २५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पाकिस्तानच्या या मुलीला मतदानाचा अधिकार मिळाला आहे. तिचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. Pakistani woman votes in UP
पतीसह मतदान केंद्रावर
सोमवारी, शहरातील मोहल्ला किल्ल्यातील रहिवासी शमीम परवीन, तिचा पती अस्लम खान याच्यासह इस्लामिया इंटर कॉलेजच्या बूथवर मतदान करण्यासाठी पोहोचली. तिने पहिल्यांदाच मतदान केले. अतिशय आनंदी दिसत असलेल्या शमीम परवीन म्हणाली की, तिने जगातील सर्वात मोठ्या लोकशाही भारताच्या प्रगती आणि समृद्धीसाठी पहिले मतदान केले आहे.
भारताने खूप प्रगती करावी
शमीमने सांगितले की, सुमारे 25 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मला भारतीय नागरिकत्व आणि लोकशाहीच्या या महान उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. यामुळे खूप खूश आहे. शमीम म्हणाली भारताने खूप प्रगती करावी अशी इच्छा आहे. त्यामुळेच शिक्षण, सुरक्षितता आणि आनंद लक्षात घेऊन पहिले मतदान केले आहे.