• Download App
    Pakistani pm ब्राह्मोसने पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त केल्याची त्यांच्या पंतप्रधानाची कबुली; पण काँग्रेस नेते करून राहिलेत (न)पाडलेल्या राफेल विमानांची गिनती!!

    ब्राह्मोसने पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त केल्याची त्यांच्या पंतप्रधानाची कबुली; पण काँग्रेस नेते करून राहिलेत (न) पाडलेल्या राफेल विमानांची गिनती!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त केल्याची कबुली त्यांच्या पंतप्रधानांनी दिली, पण काँग्रेस नेते करून राहिलेत (न)पाडलेल्या राफेल विमानांची गिनती!! Operation Sindoor ही नवीच कहाणी काँग्रेसने सुरू केली आहे.

    वास्तविक ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानी हवाईदळ उध्वस्त केल्याची कबुली पाकिस्तानचा पंतप्रधान शहाबाज शरीफ याने अझरबैजान दौऱ्यात दिली. पाकिस्तानने भारताच्या हल्ल्यांना अतिशय मोजून मापून प्रत्युत्तर दिले, पण पाकिस्तानने भारताविरुद्ध काही सैनिकी कारवाई करण्यापूर्वीच त्यांच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानचे हवाई तळ उद्ध्वस्त केले. याची माहिती फिल्ड मार्शल सय्यद असीम मुनीर यांनीच मला दिली, असे शहाबाज शरीफ याने अझरबैजान मध्ये उघडपणे सांगितले. भारताच्या हल्ल्यांच्या पुढे पाकिस्तानचे हवाई दल आणि सैन्यदल काही करू शकले नाही, याची अप्रत्यक्ष कबुली दिली. त्यांच्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये छापून आल्या. शहाबाज शरीफच्या भाषणाचे सगळे व्हिडिओ व्हायरल झाले.

    पण तरीदेखील भारतातल्या काँग्रेस नेत्यांची डोळे आणि कान यांच्यासह सगळी पंचंद्रिये बंदच राहिली म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी पाकिस्तानने भारताची किती राफेल विमाने पाडली??, याची गिनती सुरू केली. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोदी सरकारला तो सवाल विचारला. पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांनी राहुल गांधींच्या पंतप्रधान पदासाठी प्रचार करून घेतला. पण प्रत्यक्षात पाकिस्तानचा नॅरेटिव्ह चालवला. मोदींनी फक्त भाषणे केली पण इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने भारताची किती राफेल विमाने पाडली, याची माहिती मोदींनी दडवली. ती देशासमोर उघडपणे सांगितली नाही, असा आरोप रेवंत रेड्डी यांनी केला.

    Pakistani pm accepted brahmos strength, but Congress CM suspects rafele demolition

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BJP Protests : राहुल गांधी-तेजस्वी यादवांच्या पुतळ्यांचे दहन; PM मोदींबद्दल वापरलेल्या अपशब्दाचा भाजपकडून निषेध

    Despite Trump : ट्रम्पच्या टॅरिफच्या धमकी नंतरही भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘अच्छे दिन’ सुरूच, जीडीपी 7.8 टक्क्यांवर

    Rahul Gandhi : राहुल गांधी पुन्हा तोंडावर पडले, बिहारमधील गावकऱ्यांनी उघड केला खोटा दावा