• Download App
    'भारताचा पराभव म्हणजे इस्लामचा विजय', पाकिस्तानी गृहमंत्र्याचे बेताल वक्तव्य, मंत्री शेख रशीद म्हणाले- 'जगातील मुस्लिमांना फतेह मुबारक!'। Pakistani minister sheikh rasheed describes pakistan victory against india as victory of islam

    ‘भारताचा पराभव म्हणजे इस्लामचा विजय’, पाकिस्तानी गृहमंत्र्याचे बेताल वक्तव्य, मंत्री शेख रशीद म्हणाले- ‘जगातील मुस्लिमांना फतेह मुबारक!’

    दुबईच्या मैदानावर भारताविरुद्धच्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानच्या विजयानंतर तेथील चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. विश्वचषकाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध विजय मिळवला आहे. याचा पाकिस्तानी नेत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. पण या सगळ्यात पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा त्यांची कोती मानसिकता जगासमोर मांडली आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी पाकिस्तानचा विजय हा इस्लामचा विजय असल्याचे म्हटले आहे. Pakistani minister sheikh rasheed describes pakistan victory against india as victory of islam


    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : दुबईच्या मैदानावर भारताविरुद्धच्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानच्या विजयानंतर तेथील चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. विश्वचषकाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध विजय मिळवला आहे. याचा पाकिस्तानी नेत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. पण या सगळ्यात पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा त्यांची कोती मानसिकता जगासमोर मांडली आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी पाकिस्तानचा विजय हा इस्लामचा विजय असल्याचे म्हटले आहे.

    पाकिस्तानने पहिला टी-20 सामना 10 गडी राखून जिंकल्यानंतर भारतीय मुस्लिमांसह जगातील सर्व मुस्लिम आनंद साजरा करत असल्याचे रविवारी शेख रशीद म्हणाले. पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी पुन्हा एकदा धर्माबाबत भाष्य केले. त्यांनी पाकिस्तानी संघाचा विजय अल्मी इस्लामचा विजय असल्याचे म्हटले आहे. मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांच्या चमकदार कामगिरीनंतर हे वक्तव्य आले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला.



    काय म्हणाले पाकिस्तानचे गृहमंत्री?

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा पहिला सामना आहे, जो मी माझ्या राष्ट्रीय जबाबदाऱ्यांमुळे मैदानावर पाहू शकलो नाही याचे मला दु:ख आहे, असे शेख रशीद म्हणाले. परंतु मी इस्लामाबाद, रावळपिंडीकडे जाणाऱ्या सर्व रहदारीला रस्त्यावर ठेवलेले कंटेनर काढण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून लोक हा विजय उत्साहात साजरा करू शकतील. ते म्हणाले, पाकिस्तानच्या संघाचे आणि पाकिस्तानच्या जनतेचे अभिनंदन. आज आमची फायनल होती. आमची फायनल आज होती आणि जगातील मुस्लिमांसह भारतातील मुस्लिमांच्या भावना पाकिस्तानी संघासोबत होत्या. इस्लामच्या विजयाच्या सर्वांना शुभेच्छा.

    टीएलपी समर्थकांचा पाकिस्तानात गोंधळ

    सध्या पाकिस्तानात कट्टरपंथी टीएलपीच्या समर्थकांनी केलेल्या दंगलींमुळे इस्लामाबादकडे जाणारे रस्ते बंद आहेत. वास्तविक, टीएलपी समर्थक संघटनेचे नेते साद रिझवी यांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी करत आहेत. पाकिस्तानची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, परिस्थिती दंगलसदृश झाली आहे. या दंगलीमुळे आतापर्यंत तीन पोलिसांसह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या वर्षी एप्रिलमध्ये साद रिझवी यांना फ्रान्सविरोधात आंदोलन करताना अटक करण्यात आली होती. फ्रान्सच्या राजदूताला देशातून हाकलून देण्याची मागणी टीएलपीने केली.

    Pakistani minister sheikh rasheed describes pakistan victory against india as victory of islam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार