आतापर्यंत केवळ पाकिस्तान संघातील खेळाडूंनाच विश्वचषकासाठी भारताचा व्हिसा मिळाला होता
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकदिवसीय विश्वचषकादरम्यान पाकिस्तान संघासाठी एक दिलासायक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबादमध्ये होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कव्हर करण्यासाठी अनेक पाकिस्तानी पत्रकारांना भारताचा व्हिसा मिळाला आहे. आतापर्यंत केवळ पाकिस्तान संघातील खेळाडूंनाच विश्वचषकासाठी भारताचा व्हिसा मिळाला होता. मात्र आता पत्रकारांनाही व्हिसा मिळाला आहे. Pakistani journalists got visas for World Cup will come for India Pakistan match
RevSportz च्या अहवालानुसार, पाकिस्तानमधील 60 हून अधिक पत्रकारांना भारताचा व्हिसा मिळाला आहे. अहमदाबाद येथे होणार्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे सर्व पत्रकार कव्हरेज करतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या शानदार सामन्याबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळले. दोन्ही सामन्यात पाकिस्तानने विजयाची नोंद केली आहे. पहिला सामना नेदरलँड आणि दुसरा श्रीलंकेविरुद्ध खेळला गेला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने वनडे विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला होता.
Pakistani journalists got visas for World Cup will come for India Pakistan match
महत्वाच्या बातम्या
- हमासच्या 25 दहशतवाद्यांना मारणारी इस्रायली वीरांगना इनबल लिबरमॅन!!; इस्रायली भारतीयांनी केले वंदन!!
- …तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही” एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर घणाघात!
- अमेरिकेने पाठवली शस्त्रास्त्रांची पहिली खेप, आता इस्रायलच्या प्रत्युत्तरातील कारवाईने हमास हादरणार!
- रतन टाटा यांनी ‘या’ बाबतीत आनंद महिंद्रांना मागे टाकत केला नवा विक्रम