• Download App
    Pakistani Jihadi बलूच स्वातंत्र्याच्या घोषणा दडपून पाकिस्तानी जिहादी जनरलच्या विजयाचा डंका; पण तिजोरी रिकामी अन् जनतेच्या हाती कोरडा हंडा!!

    बलूच स्वातंत्र्याच्या घोषणा दडपून पाकिस्तानी जिहादी जनरलच्या विजयाचा डंका; पण तिजोरी रिकामी अन् जनतेच्या हाती कोरडा हंडा!!

    नाशिक : ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली. त्यामुळे युरोप पासून अरबस्तानापर्यंत सगळी आंतरराष्ट्रीय माध्यमे बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या घोषणेच्या बातम्यांनी भरून गेली. सोशल मीडिया वेगवेगळ्या हँडल्स वर republic of Balochistan ट्रेंड भरून वाहिला. पण पाकिस्तानातल्या माध्यमांनी मात्र बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या सगळ्या घोषणा दडपून पाकिस्तानातल्या जिहादी जनरलचा विजय झाल्याचा “डंका” पिटला.

    बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या बातम्या दडपण्यासाठी पाकिस्तानने बलूच भाषी मीडिया दडपून टाकला. बलुचिस्तान मध्ये उर्दू माध्यमांच्या बातम्या रेटून चालविल्या. आंतरराष्ट्रीय माध्यम प्रतिनिधींना बलूचिस्तान मध्ये जाण्याची बंदी घातली. पण एवढी सगळी बंधने तोडून बलूचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा करायची ती केलीच. मीर यार बलोच या नेत्याने republic of Balochistan या नावाने देश तयार झाला 9 मे 2025 हा बलूचिस्तानचा स्वातंत्र्य दिन ठरला, अशी घोषणा केली. भारतामध्ये बलूचिस्तानचा स्वतंत्र दूतावास उघडण्याची मागणी पुढे आली. त्यापाठोपाठ मीर यार बलोच आणि बलुचिस्तानचे स्वातंत्र्य जागतिक पातळीवर एकदम ट्रेंडिंग विषयामध्ये आले.

    पण या सगळ्याची भनक पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी आणि माध्यमांनी त्या देशात मात्र लागू दिली नाही, त्या उलट पाकिस्तानी माध्यमांनी जिहादी जनरल असीम मुनीर याचा ऑपरेशन सिंदूर मध्ये कसा विजय झाला, याच्या बातम्या छापल्या. पेशावर पासून लाहोर पर्यंत सरकारी खर्चाने मिरवणुका निघाल्या त्यात पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यापेक्षा असीम मुनीर याचे फोटो जास्त झळकवण्यात आले. असीम मुनीरने पाकिस्तानी फौजेचे विजय नेतृत्व केले, अशा फलकांनी मिरवणुका भरल्या होत्या.



    – जिहादी खलनायक

    पण आंतरराष्ट्रीय मीडियात मात्र असीम मुनीर हा पाकिस्तानसाठी खलनायकच ठरला. कारण त्याने जिहादी भाषण करून पहलगाम हल्ल्याला चिथावणी दिली. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानला त्याच्या एकूण हवाई ताकदीच्या 20 % ताकद गमवावी लागली. भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्राला धक्का लागेल, इथपर्यंत खोलवर हल्ले चढविले, पण पाकिस्तानची “चायना मेड एअर डिफेन्स सिस्टीम” पाकिस्तानचे संरक्षण करू शकली नाही. पाकिस्तानी अण्वस्त्रांचा घात होतोय हे पाहूनच पाकिस्तानचे राज्यकर्ते अमेरिकेकडे धावले. भारताला शस्त्रसंधी करायला भाग पाडा, अशी त्यांनी अमेरिकेकडे याचना केली.

    *हे सगळे होत असताना पाकिस्तानात अणू रेडिएशनचा धोका वाढला. किराणा हिल्स परिसरातली गावे खाली करावी लागली.
    सिंधू, चिनाबचे पाणी थांबल्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले. कराची सारख्या सगळ्यात मोठ्या शहरात 60 % पाणीकपात करावी लागली. बाकीच्या पाकिस्तानात देखील पाणीटंचाईची भीषणता वाढली. भारताने सिंधू जल करार स्थगित करू नये. त्यावरची स्थगिती उठवावी, यासाठी धमकी पासून विनंती पर्यंतची भाषा पाकिस्तानचा उपपंतप्रधान इशाक दार याला वापरावी लागली.*

    एवढे सगळे असीम मुनीर नावाच्या जिहादी जनरलच्या चिथावणी मुळे घडले. चार दिवसांच्या operation sindoor मुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्था डब्यात गेली, जनता पाण्यासाठी रस्त्यावर आली, पण तिकडे पाठ फिरवून पाकिस्तानी फौजांनी इस्लाम आणि जिहाद हेच पाकिस्तानी फौजांचे प्रेरणास्थान असल्याचे सांगून जिहादी जनरलच्या विजयाचा झेंडा फडकवला.

    (व्यंगचित्र : सुमंत बिवलकर)

    Pakistani Jihadi General’s victory stings as he suppresses Baloch independence protests

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    द फोकस एक्सप्लेनर : पाकिस्तानी उच्चायोगाच्या कर्मचाऱ्याचे रॅकेट कसे झाले उघड? भारताने केली हकालपट्टी

    Indian Air Defense : भारतीय एअर डिफेन्सने पाकची शस्त्रे नष्ट केली; चीन-तुर्कियेने सप्लाय केली होती

    Operation sindoor च्या यशामुळे काँग्रेसचा कोंडामारा; म्हणून मोदी सरकारवर केला बोचऱ्या प्रश्नांचा मारा!!