• Download App
    Pahalgam attack पाकिस्तानी लष्कर प्रमुखाचे हिंदू विरोधी भाषण, पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांच्या हत्या, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचे पुन्हा हिंदुत्वाच्या विरोधात गरळ!!

    Pahalgam attack पाकिस्तानी लष्कर प्रमुखाचे हिंदू विरोधी भाषण, पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांच्या हत्या, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचे पुन्हा हिंदुत्वाच्या विरोधात गरळ!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर याने इस्लामाबाद मध्ये हिंदू विरोधी भाषण केले. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांच्या हत्या केल्या. या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड सैफुल्ला खालिद उर्फ सैफुल्ला कसुरी पाकिस्तानी लष्कराच्या इतमामात पाकिस्तानातच राहत असताना पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफने मात्र भारतातल्या हिंदुत्ववादी सरकार विरोधात गरळ ओकले. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचा दावा केला.

    याच दरम्यान पाकिस्तानी लष्कराने बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांना भारतात घुसवायचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी ती घुसखोरी हाणून पाडली. दोन दहशतवाद्यांना ठार केले.

    पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी इस्लामाबाद मध्ये हिंदू विरोधी भाषण केल्यानंतरच पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांची हत्या केली. त्या दहशतवादी हल्ल्याचा कट मास्टर माईंड सैफुल्ला खालिद याने रचला. तो पाकिस्तान मध्ये बसला असताना देखील ख्वाजा असीफने ते पुरावे नाकारले, पण भारतातल्या हिंदुत्ववादी सरकारवर ठपका ठेवला.

    ख्वाजा असीफ म्हणाला :

    पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा कुठलाही हात नाही. भारतामध्ये तिथल्या हिंदुत्ववादी सरकार विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी असंतोष माजला आहे. त्यातूनच त्या सरकारच्या विरोधात एक ठिकाणी बंड झाले. स्थानिक लोकांनी हातात शस्त्रे घेऊन पर्यटकांच्या हत्या केल्या.

    भारतातल्या हिंदुत्ववादी सरकारने अल्पसंख्याकांचे अधिकार काढून घेतले. त्यांच्यावर दडपशाही केली. त्यात केवळ मुसलमानाच नाही, तर बुद्धिस्ट आणि ख्रिश्चन देखील आहेत. या सगळ्यांना भारताने दुय्यम नागरिक करून ठेवले. म्हणून हिंदुत्ववादी सरकारच्या विरोधात मणिपूर, छत्तीसगड, नागालँड यासारख्या राज्यांमध्ये बंड झाली. त्याचा परिणाम पहलगाय मध्ये दिसला.

    पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही. तिथल्या स्थानिक दहशतवाद्यांनी पर्यटकांचे हत्या केली. पण पर्यटकांची हत्या करणे चूक आहे.

    Pakistani defence minister blamed Hindu government for Pahalgam attack

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bansuri Swaraj : प्रियांकांच्या बॅग पॉलिटिक्सला बांसुरी स्वराज यांचे उत्तर, जेपीसी बैठकीला ‘नॅशनल हेराल्ड की लूट’वाली बॅग घेऊन पोहोचल्या

    Saifullah Khalid alias Kasuri : पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला खालिद उर्फ ​​कसुरी कोण आहे?

    Air India : अमेरिका-चीन टॅरिफ वॉरचा एअर इंडियाला फायदा; कंपनी बोइंगची चिनी शिपमेंट खरेदी करणार