pakistan sgpc congratulates navjot sidhu : पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (पीएसजीपीसी) नवज्योतसिंग सिद्धू यांचे पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धू यांचे अभिनंदन करताना पीएसजीपीसीने असेही म्हटले की, जगभरातील शीखांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. यासह पीएसजीपीसीने त्यांना करतारपूर कॉरिडोर पुन्हा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन केले. pakistan sgpc congratulates navjot sidhu on becoming president bjp and akali dal target sidhu
विशेष प्रतिनिधी
चंदिगड : पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (पीएसजीपीसी) नवज्योतसिंग सिद्धू यांचे पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धू यांचे अभिनंदन करताना पीएसजीपीसीने असेही म्हटले की, जगभरातील शीखांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. यासह पीएसजीपीसीने त्यांना करतारपूर कॉरिडोर पुन्हा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
पाक स्थिती कमिटीच्या या अभिनंदनामुळे सिद्धू हे विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले आहेत. शिरोमणी अकाली दल आणि भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. सिद्धू यांनी स्वत: स्क्रिप्ट लिहिल्याचा आरोप भाजप पंजाबचे अध्यक्ष अश्विनी शर्मा यांनी केला. ते म्हणाले की, कॉरिडोर उघडण्याचा निर्णय केंद्र सरकार घेईल आणि यात सिद्धू यांची कोणतीही भूमिका नाही. दोन देशांमधील हा मुद्दा आहे.
अकाली दलाने म्हटले की, कॉरिडॉरबाबत सिद्धूंची कोणतीही भूमिका नव्हती
त्याचबरोबर अकाली दलाचे प्रवक्ते दलजितसिंग चीमा म्हणाले की, पीएसजीपीसीने हे लक्षात ठेवले पाहिजे की ही वैयक्तिक बाब नाही, तर दोन देशांमधील मुद्दा आहे. ते म्हणाले की, अभिनंदन कोणालाही करता येईल, परंतु यापूर्वी कॉरिडॉरच्या बाबतीत सिद्धू यांची कोणतीही भूमिका नव्हती आणि भविष्यातही असू शकत नाही. कॉरिडॉर सुरू करण्याची मागणी चिमा यांनीही केंद्र सरकारकडे केली.
कॅप्टन अमरिंदर यांनी सांगितला होता पाकचा मोठा धोका
विशेष म्हणजे सिद्धू यांच्या पंजाब कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या पदग्रहण सोहळ्यादरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पाकचा मोठा धोका असल्याचे सांगितले होते. हा सोहळा 23 जुलै रोजी झाला. कॅप्टन म्हणाले होते की, पंजाबची सुमारे 600 किमी सीमा पाकिस्तानशी लागून आहे. यामुळे आपण सुरक्षेची काळजी घ्यायला हवी.
pakistan sgpc congratulates navjot sidhu on becoming president bjp and akali dal target sidhu
महत्त्वाच्या बातम्या
- कृषी कायद्यांच्या निषेधार्थ राहुल गांधी ट्रॅक्टरवरून पोहोचले संसदेत, म्हणाले- शेतकऱ्यांचा आवाज दाबला जातोय !
- महिलेला दमदाटी करणाऱ्या भास्कर जाधवांना मनसेच्या महिला नेत्याने तडकवले; भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही; मनसेचा इशारा
- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भारताकडे येणार, समतोलासाठी उपयुक्त बाब
- १५५ किलोमीटर वेगाने घोंघावणाऱ्या ‘इन-फा’ वादळाचा चीनला तडाखा, शेकडो विमाने रद्द
- अबुधाबीतील भारतीय वंशाचे उद्योजक युसुफअली यांच्या शिरपेचात मानाचा तुरा