• Download App
    मोदी सरकार परतण्याची पाकिस्तानी सरकारला चिंता, पण त्यांच्या लष्कराला भीती; त्यातूनच अणुबॉम्बची धमकी!! Pakistan government worried about return of Modi government

    मोदी सरकार परतण्याची पाकिस्तानी सरकारला चिंता, पण त्यांच्या लष्कराला भीती; त्यातूनच अणुबॉम्बची धमकी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या मॅन्डेटसह मोदी सरकार भारतात सत्तेवर येऊ शकते, याची पाकिस्तानी सरकारला चिंता आहे. पण लष्कराला जास्त भीती वाटते. त्यामुळेच पाकिस्तानच्या लष्करी गोटातून अणुबॉम्बची धमकी दिली गेली आहे. Pakistan government worried about return of Modi government

    लोकसभा निवडणुकीनंतर भारतामध्ये मोदी सरकार नको. बाकी कुठलेही सरकार चालेल, असे पाकिस्तानी नेत्यांचे मनसुबे सोशल मीडियातून बाहेर आले. इम्रान खान सरकार मधले माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी उघडपणे तशी ट्विट केली. कारण मोदी सरकार पाकिस्तानच्या कुठल्याच व्यवस्थेला घाबरत नाही. त्यांच्याशी बोलायला तयार नाही. त्यामुळे पाकिस्तानचा रेलेव्हन्स संपतो की काय?? अशी भीती पाकिस्तानी नेत्यांना आणि लष्कराला वाटते आहे.

    त्यातूनच भारतात लोकसभा निवडणुकीतल्या प्रचारादरम्यान पाकिस्तानातल्या अणुबॉम्बची चर्चा सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानी अणुबॉम्बची खिल्ली उडवली. पाकिस्तानच्या हातात बांगड्या भरण्याची भाषा केली. त्यामुळे पाकिस्तानी राजकीय आणि लष्करी व्यवस्था संतापली, पण त्या संतापाचे रूपांतर कुठल्या वेगळ्याच पोटात होण्याऐवजी पाकिस्तान अंतर्गत अस्वस्थतेतच झाले. कारण पाकिस्तानकडे जर अणुबॉम्ब असेल, तर भारताकडे काय आहे आणि भारताचा अणुबॉम्ब शोभेला ठेवलाय का??, असा सवाल तयार झाला आणि तो अनेकांनी सोशल मीडियावर विचारला. आता या सगळ्या अणुबॉम्ब प्रकरणाचे रूपांतर पाकिस्तानच्या धमकीत झाले आहे.

    गरज पडली, तर अणुबॉम्बचा वापर

    पाकिस्तानच्या अणुबॉम्बची सुरक्षा आणि देखरेख नॅशनल कमांड अथॉरिटीकडे आहे. या संस्थेचे प्रमुख सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) खालिद अहमद किडवई यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. अणुबॉम्बविषयी पाकिस्तानचे “नो फर्स्‍ट यूज” असे कोणतेही धोरण नाही. आमचा अणुबॉम्ब तयार आहे. भारत “नो फर्स्‍ट यूज” धोरणाचे पालन करतो. पण पाकिस्तान गरज पडली तर अणुबॉम्बचा हल्ला करु शकतो, अशी धमकी त्यांनी दिली.

    – पाकिस्तानी लष्कराला भीती

    भारतातील सुरक्षा तज्ज्ञांनी “नो फर्स्‍ट यूज” धोरण देशासाठी घातक असल्याने ते बदलण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्याचे पडसाद उमटले होते. त्यावेळी मोदी सरकारने त्याविषयी कोणताही निर्णय घेतला नाही. पण तिसऱ्यांदा मोदी सरकार येण्याचा अंदाज येताच पाकिस्तानी सैन्यात अस्वस्थता वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याने तो भारताच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकतो आणि त्याच्या समोर कधीच झुकणार नाही, हे भारतीय नेतृत्वाने आता तरी ओळखायला हवे, अशी फुशारकी किडवई यांनी मारली.

    पीएम मोदींच्या चिमट्यानंतर थयथयाट

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानच्या अणुबॉम्बविषयी चिमटा काढला होता. काँग्रेसवर निशाणा साधताना त्यांनी हा वार केला होता. त्यानंतर किडवई यांनी त्याला उत्तर दिले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करत पाकिस्तान अणुकार्यक्रम पुढे नेत असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तान लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडे अणुबॉम्ब असल्याचा दावा किडवई यांनी केला. पाकिस्तानचा अणुबॉम्ब भारताचा 2750 किमीपर्यंतचा परिसरवर निशाणा साधू शकतो, असे ते म्हणाले. पण किडवई यांच्या वक्तव्यातून मोदी सरकार परत येण्याच्या शक्यतेने पाकिस्तानी लष्कर घाबरल्याची चिन्हे लपून राहिली नाहीत.

    Pakistan government worried about return of Modi government

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!