विशेष प्रतिनिधी
धुळे : Akhilesh Yadav पाकिस्तानात महागाईचा कहर आणि बांगलादेशात बँकांमध्ये खडखडाट झालाय तरी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महाराष्ट्रातल्या धुळ्यात येऊन दोन्ही देशांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन भारताची बदनामी केली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अखिलेश यादव यांनी धुळ्यात येऊन भारताची बदनामी केली.Akhilesh Yadav
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीचा प्रचार करण्यासाठी अखिलेश यादव मालेगाव आणि धुळ्यात आले होते. या दोन्ही मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये त्यांनी प्रचाराची भाषणे केली. यावेळी बोलताना अखिलेश यादव म्हणाले, मोदी सरकार भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची झाल्याच्या बाता मारते. परंतु, माझ्याकडची आकडेवारी जर खरी असेल तर नुकताच भूकबळींचा इंडेक्स जागतिक पातळीवर प्रसिद्ध झालाय. त्यामध्ये पहिल्या पाचांमध्ये भारताचा नंबर लागतो. भारतात भूकबळींची संख्या वाढल्याचे त्या आकडेवारीवरून दिसते. त्या उलट भारताच्या शेजारच्या दोन्ही देशांची कामगिरी यामध्ये चांगली आहे. त्या दोन्ही देशांमध्ये भूकबळी नाहीत, असा दावा अखिलेश यादव यांनी केला.
प्रत्यक्षात भारतामध्ये गेल्या तीन वर्षात मोदी सरकारने 80 कोटी जनतेला मोफत धान्य वाटप केले. ते 2028 पर्यंत तसेच चालू राहणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तान सारख्या देशात महागाईचा कहर झाला आहे. तिथे आट्यासाठी ट्रक वर उडालेली झुंबड याचे व्हिडिओ जगाच्या सगळ्या देशांमध्ये व्हायरल झाले. तिथे सगळ्याच वस्तूंची महागाई प्रचंड वाढली. पाकिस्तानी अर्थव्यवस्था डबघाईला आल्यामुळे त्या देशाचे नेते जगभरात कटोरा घेऊन हिंडत आहेत.
दुसरीकडे बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांच्या मार्गदर्शनाखालच्या सरकारच्या नेतृत्वाखाली बँकांमध्ये खडखडाट झालाय. तिथे कॅशच शिल्लक नाही. ठेवीदारांना देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून बँकांचे मॅनेजर धाय ढकलून रडत असल्याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले.
अशा भारताच्या दोन शेजारी देशांच्या आर्थिक दुरवस्था असताना अखिलेश यादव यांनी मात्र त्या देशांमध्ये भूकबळी नाहीत, असा दावा करून त्यांच्यावर धुळ्यात येऊन स्तुतीसुमने उधळली.
Pakistan, bank collapse in Bangladesh; But Akhilesh showered praises on both the countries from the dust!!
महत्वाच्या बातम्या
- Tarun Chugh : फुकट आणि अनियंत्रित खर्चांमुळे पंजाब बरबाद झाला आहे – तरुण चुग
- Marathi Pali Prakrit : मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांच्या अभ्यासकांनी मोदी सरकारचे मानले आभार
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा झारखंड सरकारला 1 लाखांचा दंड; राज्य सरकार व PSUच्या निरुपयोगी याचिक; अधिकारी जबाबदार
- Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत बिघाडी; नाना पटोलेंसोबत चर्चा करण्यास उद्धव ठाकरे गटाचा नकार, काँग्रेसच्या वरिष्ठांशी करणार चर्चा