• Download App
    पाकिस्तान आर्थिक संकटाच्या गर्तेत, तरी बिलावल भुट्टोंना भारताशी शत्रुत्वाची मस्ती; आधी म्हणाले, "मित्र" नंतर म्हणाले "शेजारील देश"!! Pak FM Bilawal Bhutto calls India friend stutters and corrects it to neighbouring country

    पाकिस्तान आर्थिक संकटाच्या गर्तेत, तरी बिलावल भुट्टोंना भारताशी शत्रुत्वाची मस्ती; आधी म्हणाले, “मित्र” नंतर म्हणाले “शेजारील देश”!!

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकला आहे. तरी देखील भारताशी शत्रुत्व करण्याची त्या देशाची खुमखुमी अजून गेलेली नाही. उलट भारताला शत्रू मानून जास्तीत जास्त खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचे काम पाकिस्तानचे राज्यकर्ते आजही करत आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी एका इस्लामिक कॉन्फरन्स मध्ये भारताला आधी “मित्र” असे संबोधले, पण लगेच त्यात “सुधारणा” करून “शेजारील देश” असे संबोधून काश्मीर प्रश्न उकरून काढला. भारतात मुस्लिमांवर आणि विशेषतः मुस्लिम महिलांवर अत्याचार होत असल्याचा आरोप केला. Pak FM Bilawal Bhutto calls India friend stutters and corrects it to neighbouring country

    प्रत्यक्षात पाकिस्तानात अल्पसंख्यांकांचे जीवित आणि मालमत्ता धोक्यात आहे. तरी देखील त्या देशाने “इस्लाम मधील महिला” या विषयावर कॉन्फरन्स घेतली. स्वतःच्या देशाची पाठ थोपटून घेतली आणि भारतावर मात्र मुसलमानांवर अत्याचार केल्याचा आरोप ठेवला. याच कॉन्फरन्स मध्ये बोलताना बिलावल भुट्टो यांनी भारताला सुरवातीला “मित्र” असे संबोधले, पण लगेच आपण चूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी भारताला “शेजारील देश” असे संबोधून वेगवेगळ्या आरोपांच्या फैरी झाडल्या.

    पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाच्या गर्तेत अक्षरशः बुडाला आहे. महागाईने मिनारांपेक्षाही मोठी उंची गाठली आहे. परकीय गंगाजळीने तळ गाठला आहे. पण भारताशी शत्रुत्व करण्याची पाकिस्तानी राज्यकर्त्यांची खुमखुमी मात्र गेलेली नाही, हेच बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्यातून दिसून आले आहे.

    हेच ते बिलावल भुट्टो आहेत, ज्यांचे आजोबा जुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते आणि त्यांनी पाकिस्तानी जनता गवत खाईल पण अणुबाँब बनवेलच, अशी भारताला धमकी दिली होती. पण त्यांच्याच नेतृत्वाखाली 1971 मध्ये पाकिस्तानला भारताकडून युद्धात मार खावा लागला होता आणि त्या युद्धानंतरच भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशाची निर्मिती केली होती.

    Pak FM Bilawal Bhutto calls India friend stutters and corrects it to neighbouring country

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    तेराव्या बॉम्बस्फोटाची स्टोरी मुंबई “वाचवण्यासाठी”; दोन माणसांच्या भेटीची स्टोरी राहुल गांधींना बातम्यांच्या केंद्रस्थानावरून हटविण्यासाठी??

    Strategic Balance : भारताने अमेरिकेशी संरक्षण सामग्री करार चर्चा थांबवली नाही, पण मोदी – पुतिन यांच्यातही चर्चा!!

    India : रिपोर्ट- भारत अमेरिकेकडून शस्त्रे-विमाने खरेदी करणार नाही; संरक्षणमंत्र्यांचा वॉशिंग्टन दौरा रद्द