• Download App
    Paitongtarn Shinawatra थायलंडच्या पंतप्रधानपदी पाइतोंग्तार्न शिनावात्रा

    Paitongtarn Shinawatra : थायलंडच्या पंतप्रधानपदी पाइतोंग्तार्न शिनावात्रा; 23 वर्षांत एकाच कुटुंबातील तिसऱ्या PM

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : थायलंडमध्ये संसदेने पाइतोंग्तार्न शिनावात्रा ( Paitongtarn Shinawatra ) यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली आहे. माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांच्या त्या कन्या आहेत. 37 वर्षीय पाइतोंग्तार्न या देशाच्या 31व्या पंतप्रधान बनल्या आहेत. थायलंडच्या इतिहासातील त्या सर्वात तरुण पंतप्रधान, तसेच हे पद भूषवणाऱ्या देशातील दुसऱ्या महिलाही आहेत.

    यिंगलक या थायलंडच्या पंतप्रधान झालेल्या देशातील पहिल्या महिला होत्या. त्या पाइतोंग्तार्न यांच्या मावशी आहेत. पाइतोंग्तार्न या शिनावात्रा कुटुंबातील पंतप्रधान बनलेल्या तिसऱ्या नेत्या आहेत. थाक्सिन यांचे मेहुणे सोमचाई वोंगसावत यांनीही 2008 मध्ये थायलंडचे पंतप्रधान म्हणून काम केले होते.


    Ramgiri Maharaj : मुस्लिम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यनंतर रामगिरी महाराजांविरोधात 5 गुन्हे दाखल; संभाजीनगर-नगरमध्ये जमाव आक्रमक


    थाक्सिन 2001 मध्ये थायलंडचे पंतप्रधान झाले. थाक्सिन शिनावात्रा यांची सत्तापालटाच्या माध्यमातून सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली. पाइतोंग्तार्न या सत्ताधारी पक्ष ‘फेउ थाई’च्या नेत्या आहेत. तथापि, पाइतोंग्तार्न अद्याप खासदार नाहीत.

    निवडणुकीत पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला, सर्वात मोठा पक्ष बाद झाला

    संसदेत शिनावात्रा यांच्या बाजूने 319 मते पडली, तर त्यांच्या विरोधात 145 मते पडली. 27 खासदारांनी मतदान केले नाही. सभागृहात 493 खासदार आहेत. पाइतोंग्तार्न यांना बहुमत मिळविण्यासाठी 248 मतांची आवश्यकता होती. शुक्रवारी 489 खासदार सभागृहात उपस्थित होते.

    पाइतोंग्तार्न​​​​​​​ शिनावात्रा या 2023 पासून फेउ थाई पार्टीच्या अध्यक्ष आहेत. एप्रिल 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारही होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

    याआधी गेल्या आठवड्यात घटनात्मक न्यायालयाने मुख्य विरोधी पक्ष मुव्ह फॉरवर्ड पार्टीला फेटाळून लावले होते. याशिवाय त्यांच्या सर्व नेत्यांवर 10 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत मुव्ह फॉरवर्ड पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या.

    Paitongtarn Shinawatra as Prime Minister of Thailand

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    IndiGo : अहमदाबाद विमानतळावर इंडिगोचे आपत्कालीन लँडिंग; कुवैतहून दिल्लीला येणाऱ्या विमानात टिश्यू पेपरवर हायजॅक व बॉम्ब असल्याची धमकी मिळाली

    LNG-Powered Train : देशातील पहिली एलएनजी ट्रेन धावण्यासाठी सज्ज; एकदा टाकी पूर्ण भरल्यावर 2200 किलोमीटरपर्यंत धावेल, डिझेलच्या तुलनेत तीनपट खर्च कमी

    Chief Punit Garg : RCOM चे माजी अध्यक्ष पुनीत गर्ग यांना अटक; ईडीने 40 हजार कोटींच्या बँक फसवणुकीप्रकरणी अटक केली; फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा आरोप