• Download App
    Pahalgam, J&K अमरनाथ यात्रेत घातपाताचा संशय; तीन संशयीतांना फेशियल रेकग्निशन कॅमेऱ्यावरून ओळखून अटक!!

    अमरनाथ यात्रेत घातपाताचा संशय; तीन संशयीतांना फेशियल रेकग्निशन कॅमेऱ्यावरून ओळखून अटक!!

    वृत्तसंस्था

    पहलगाम, जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार अत्यंत काटेकोर काळजी घेत आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. पण तरीही पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयचा अमरनाथ यात्रेत घातपात करायचा इरादा लपून राहिलेला नसून अमरनाथ यात्रेत काहीतरी घातपात घडवून आणण्यासाठी आयएसआयने स्लीपर सेल्स कार्यरत केल्याची बातमी समोर आली. Pahalgam, J&K

    – फेस रेकग्निशन प्रणालीचा वापर 

    या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर पोलिसांनी अनंतनाग मध्ये तीन संशयितांना अटक केली. तीन ‘ओव्हर ग्राउंड वर्कर्स’ (OGW) ना ताब्यात घेतल्याप्रकरणी अनंतनागचे एसएसपी (SSP) अमोद नागपुरी म्हणाले, “यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, जम्मू-काश्मीर पोलिसांनी संपूर्ण परिसरात ‘फेशियल रिकग्निशन’ (चेहरा ओळखणारे) सॉफ्टवेअर असलेले ३४ कॅमेरे बसवले आहेत.

    OGW, शरण आलेले दहशतवादी आणि संशयास्पद पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची माहिती या सॉफ्टवेअरच्या डेटाबेसमध्ये समाविष्ट करणे हा यामागचा उद्देश आहे. जेव्हा अशी एखादी व्यक्ती या कॅमेऱ्यांसमोरून जाते, तेव्हा एक ‘अलर्ट’ (सूचना) मिळतो. आज सकाळी, फेशियल रेकग्निशन प्रणालीने अशा तीन संशयास्पद व्यक्तींना ओळखले. त्या सध्या ताब्यात असून, या परिसरात त्यांच्या उपस्थितीबाबत आणि हालचालींबाबत त्यांची चौकशी केली जात आहे.”

    या तीन संशयीतांकडून काही महत्वपूर्ण माहिती आणि धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असून त्यानुसार जम्मू काश्मीरचे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा पुढची कारवाई करणे अपेक्षित आहे.

    Pahalgam, J&K: On three Over Ground Workers (OGW) being apprehended, SSP, Anantnag, Amod Nagpuri

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पिनाका लांब पल्ल्याच्या गाईडेड रॉकेटची अचूक माऱ्याची चाचणी यशस्वी; सीमेपार दहशतवाद्यांचे अड्डे टार्गेट करणे सोपे!!

    Telangana : तेलंगणा डीएसपीकडे ₹300 कोटींची मालमत्ता सापडली; नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली

    India-Indonesia : इंडोनेशिया भारताचे ‘ब्रह्मोस’ खरेदी करणार; ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेले ‘अस्त्र’ही घेणार; मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान