• Download App
    Pahalgam attack पहलगाम हल्ल्याची खरी तुलना मणिपूरशी नव्हे, तर इजरायल वर हमासने केलेल्या हल्ल्याशी; मोदींकडून अपेक्षा पाकिस्तानी लष्कर चिरडण्याची!!

    Pahalgam attack पहलगाम हल्ल्याची खरी तुलना मणिपूरशी नव्हे, तर इजरायल वर हमासने केलेल्या हल्ल्याशी; मोदींकडून अपेक्षा पाकिस्तानी लष्कर चिरडण्याची!!

    नाशिक : जम्मू-काश्मीरच्या पहलगांमध्ये पाकिस्तानी लष्करातल्या कमांडोजने दहशतवाद्यांचा बुरखा पांघरून हिंदू पर्यटकांची हत्या केली. त्यांना धर्म विचारला. कलमा पढायला लावला. पॅन्ट उतरवून त्यांच्या धर्म तपासला. मग त्यांना गोळ्या घातल्या. पण भारतातल्या काही लिबरल लोकांनी पहलगाम मधल्या इस्लामी जिहादी हल्ल्याची तुलना मणिपूर मधल्या जातींमधल्या संघर्षाशी केली. पण या दोन्ही हल्ल्यांची एकमेकांशी तुलना करणे योग्य की पहलगाम हल्ल्याची हमास दहशतवादी संघटनेने इजरायलवर केलेले हल्ल्याशी करणे योग्य??, याचे उत्तर लिबरल बौद्धिक दिवाळखोरांपेक्षा भारतातल्या लष्करी तज्ज्ञांनी समर्पक दिले आहे. Pahalgam attack

    माजी हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदौरिया, जम्मू काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक DGP एस. पी. वैद, प्रफुल्ल बक्षी, इंद्रजीत सिंह चुघ या सगळ्या लष्करी तज्ज्ञांनी पहलगाम हल्ल्याची तुलना हमास दहशतवादी संघटनेने इजरायल वर केलेल्या हल्ल्याशी केली. त्यामुळे बौद्धिक दिवाळखोरांनी उभ्या केलेल्या नॅरेटिव्हला अभ्यासपूर्ण धक्का बसला.

    पाकिस्तानने आता दहशतवाद पुरस्कृत करण्याची मोडस ऑपरेंडी बदलली असून त्यामध्ये आता एडिशन्स केल्याचे लष्करी तज्ञांनी सांगितले. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI जम्मू काश्मीर मधल्या तरुणांच्या धार्मिक भावना भडकवून त्यांना दहशतवादाचे ट्रेनिंग देत असे. त्यातून स्लीपर सेल्स तयार करत असेल. आताही ते काम त्या देशात सुरू आहेच, पण याचबरोबर पाकिस्तानी लष्करातले कमांडोज आता दहशतवाद्यांचे बुरखे पांघरून भारतात येऊन कारवाया करत आहेत.



    पाकिस्तानी लष्करातले 80 ते 90 कमांडोज काश्मीर खोऱ्यातल्या तीन जिल्ह्यांमध्ये दहशतवादी बनून वावरत आहेत, तर जम्मू प्रदेशात 60 ते 70 कमांडोज दहशतवाद्यांच्या रुपात कार्यरत आहेत. हे पाकिस्तानी कमांडोज जम्मू-काश्मीर मधले दहशतवाद यांचे स्लीपर सेल्स galvanize करून तयार करत आहेत. हे सगळे पाकिस्तानी कमांडोज जम्मू आणि काश्मीरच्या अनेक जिल्ह्यांमध्ये 4 – 5 चे गट करून हिंडतात. स्थानिक लोकांमध्ये ते सहज मिसळून जातात. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे अवघड बनते.

    याच पाकिस्तानी कमांडोज पैकी 5 ते 7 जणांनी पहलगाम हल्ल्याची अंमलबजावणी केली. त्यांना 2 स्थानिक दहशतवाद्यांनी साथ दिली. त्यापैकी चौघांचे फोटो जम्मू कश्मीर पोलिसांनी जारी केले.

    – हमासचे इजरायल वर हल्ले

    पाकिस्तानी लष्कराची ही बदललेली मोडस ऑपरेंडी लक्षात घेता पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याची तुलना मणिपूर मधल्या हिंसाचाराशी होऊ शकत नसून, ती हमास दहशतवादी संघटनेने इजरायल वर केलेल्या हल्ल्याशी होऊ शकते. कारण पहलगाम मध्ये पाकिस्तानी कमांडोंनी हिंदूंचे टार्गेटेड किलिंग केले, तसेच हमासने 7 ऑक्टोबर 2023 ला इजरायल मध्ये ज्यू समाजाच्या वस्त्यांवर तुफान हल्ले चढवून हजारोंचे हत्याकांड घडविले. इस्लामी जिहादी दहशतवाद्यांचे परधर्मीयांवर टार्गेटेड हल्ले करण्यातली समानता पहलगाम आणि इजरायल मध्ये समोर आली.

    – कठोर कारवाईची अपेक्षा

    म्हणूनच केंद्रातल्या मोदी सरकारकडून पाकिस्तानवर इजरायल स्टाईल हल्ल्याची अपेक्षा वाढली. केवळ सर्जिकल स्ट्राइक किंवा एअर स्ट्राइक करून भागणार नाही कारण या दोन्ही हल्ल्यांना तोंड देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने यंत्रणा सज्ज ठेवली. त्यांची विमाने काल रात्रभर सरहद्दीवर ग्रस्त घालत होती. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइक किंवा एअर स्ट्राइक यांच्यापेक्षा गंभीर आणि मोठी कारवाईची गरज लष्करी तज्ज्ञांनी व्यक्त करून मोदी सरकार विषयीची अपेक्षा वाढविली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांची सुमारे अडीच तास बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेयर्स या निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च संस्थेची बैठक झाली. अर्थातच दोन्ही बैठकांमधले खरे तपशील बाहेर येण्याची शक्यता नाही. स्ट्रॅटेजिक दृष्ट्या तसे ते बाहेर येणे योग्यही नाही. पण मोदी सरकारकडून कठोऱ्यातल्या कठोर कारवाईची अपेक्षा मात्र त्यातून पूर्ण झाली पाहिजे, एवढी समस्त भारतीयांची इच्छा लष्करी तज्ज्ञांनी बोलून दाखवली.

    Pahalgam attack can be compared only with Hamas attack on Israel

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    IndiGo : इंडिगोने श्रीनगरला जाणाऱ्या विमानांचे कॅन्सलेशन अन् रिशेड्यूलिंगचे शुल्क माफ केले

    Bansuri Swaraj : प्रियांकांच्या बॅग पॉलिटिक्सला बांसुरी स्वराज यांचे उत्तर, जेपीसी बैठकीला ‘नॅशनल हेराल्ड की लूट’वाली बॅग घेऊन पोहोचल्या

    Saifullah Khalid alias Kasuri : पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला खालिद उर्फ ​​कसुरी कोण आहे?