विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. एकूण १३९ मान्यवरांपैकी सात दिग्गजांना पद्म विभूषण, १९ दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. त ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १४ जणांचा समावेश आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, वन अभ्यासक मारूती चित्तमपल्ली यांचा समावेश आहे
महाराष्ट्रातील तीन दिग्गजांना पद्मभूषण व ११ दिग्गजांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. याद्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्कारांमध्ये देशातील विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील मारूती चित्तमपल्ली, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे. तसेच शैली होळकर, डॉ.नीरजा भाटला, भीमसिंह भावेश, थविल वादक पी.दत्चनमूर्ती, शेखा एजे अल सबा, एल हँगथिंग, भैरूसिंग चौहान, जगदीश जोशीला, सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, हरविंदर सिंग यांना देखील पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
Padma Award to 14 veterans of Maharashtra including Ashok Saraf, Maruti Chittampalli
महत्वाच्या बातम्या
- 10 आमदारांच्या बळावर विरोधी पक्षनेते पदासाठी पवारांचा “मोठ्ठा डाव”; पण ठाकरे + काँग्रेसला पटतचं नाय!!
- Bhandara : भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
- Muhammad Yunus : मोहम्मद युनूस राजीनामा देतील? बांगलादेशात निषेधाचे आवाज उठू लागले
- Guillain Barré : पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमची एकूण रूग्ण संख्या ६७ वर पोहचली