विशेष प्रतिनिधी
कोची : केरळमध्ये सासरे आणि जावई हे दोघेही विधिमंडळात एकत्र असण्याचा योग यावेळी जुळून आला आहे. हे सगळे मुख्यमंत्री पी.विजयन यांच्याचबाबतीत घडून आले आहे.P. vijayan and P.A. Mohamad wins election
सासरे विजयन हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून त्यांचे जावई पी.ए. मोहंमद रियाझ हे देखील आमदारकीची शपथ घेतील.रियाझ हे डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
रियाझ यांनी काही दिवसांपूर्वीच विजयन यांच्या कन्या वीणा यांच्याशी विवाह केला होता. ते स्वतः आयटी क्षेत्रातील बडे उद्योजक असून बंगळूरमध्ये त्यांची स्वतःची कंपनी देखील आहे.
विजयन हे कन्नूर जिल्ह्यातील धरमादम मतदारसंघातून पन्नास हजार मतांच्या फरकांनी विजयी झाले असून रियाझ (वय ४४) हे कोझीकोडमधील बेपोर मतदारसंघातून जिंकले आहेत.
अन्य नेत्यांचा गोतावळा देखील निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरला होता. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष पी.जे. जोसेफ थोडूपुझ्झामधून विजयी झाले असून त्यांचे जावई डॉ. जोसेफ हे मात्र कोथामंगलममधून पराभूत झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांची मुलेही मैदानात उतरली होती. काँग्रेस नेते के. मुरलीधरन आणि पद्मजा वेणुगोपाल यांनाही पराभव पत्कारावा लागला.
P. vijayan and P.A. Mohamad wins election
महत्त्वाच्या बातम्या
- द्रमुक कार्यकर्त्यांकडून अम्मा कँटीनमध्ये धुडगूस, जयललिता यांची पोस्टर फेकून दिली
- महाराष्ट्राला मिळाले कोविशिल्डचे नऊ लाख डोस, १५ जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या कमी
- लॉकडाउनसाठी केंद्रावर दबाव, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तज्ज्ञ आग्रही
- कोणतीही प्रचारसभा न घेता अखिल गोगोईना मिळाली ५७ हजार मते, तुरुंगात राहूनच मिळवला विजय
- Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार अपयशी, विशेष अधिवेशन बोलवावं, चंद्रकांत पाटलांची मागणी