• Download App
    रुग्णसेवेतच राम, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट उभारणार ऑक्सिजन प्रकल्प|Oxygen project to set up by Shri Ram Janmabhoomi Trust

    रुग्णसेवेतच राम, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट उभारणार ऑक्सिजन प्रकल्प

    कोरोनाच्या संकटात रुग्णांची सेवा हिच प्रभू रामचंद्रांची सेवा मानून श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टनेही रुग्णसेवेच्या कामाची सुरूवात केली आहे. कोरोना रुग्णांची मदत करण्यासाठी ट्रस्ट दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार आहे.Oxygen project to set up by Shri Ram Janmabhoomi Trust


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात रुग्णांची सेवा हिच प्रभू रामचंद्रांची सेवा मानून श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टनेही रुग्णसेवेच्या कामाची सुरूवात केली आहे. कोरोना रुग्णांची मदत करण्यासाठी ट्रस्ट दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार आहे.

    अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. अयोध्येतील मंदिर आणि इतर विकासाच्या कामांसाठी ट्रस्टने निधीही जमा केला आहे. या निधीतूनच आता कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे.



    श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या जिल्ह्यातऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ट्रस्टतर्फे दशरथ मेडीकल कॉलेजमध्ये दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचा सर्व खर्च ट्रस्टतर्फे करण्यात येणार आहे.

    श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे डॉ. अनिल मिश्र यांनी सांगितलेकी संपूर्ण देश आज कोरोना महामारीच्या संकटात आहे. त्यामुळे ट्रस्टने ५५ लाख रुपये खर्च करून दशरथ मेडीकल कॉलेजमध्ये दोन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

    Oxygen project to set up by Shri Ram Janmabhoomi Trust

    महत्वाच्या’ बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!