• Download App
    दोष ईव्हीएमचा नसून लोकांच्या डोक्यात बसविण्यात आलेल्या चिपचा, उत्तर प्रदेशातील पराभवानंतर ओवेसी यांचा आरोप|Owesi says Blame it on chips that are planred in peoples brain, not on Evms

    दोष ईव्हीएमचा नसून लोकांच्या डोक्यात बसविण्यात आलेल्या चिपचा, उत्तर प्रदेशातील पराभवानंतर ओवेसी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद : दोष ईव्हीएमचा नसून लोकांच्या डोक्यात बसवण्यात आलेल्या चिपचा आहे. काही राजकीय पक्ष त्यांचे अपयश लपवण्यासाठी ईव्हीएम ईव्हीएमचा गजर आहेत. मात्र, मी 2019 मध्येही सांगितलं होतं की चूक ईव्हीएमची नाही लोकांच्या डोक्यात टाकण्यात आलेल्या चिपचा हा परिणाम आहे,असे एमआयएमचे नेते अससुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.Owesi says Blame it on chips that are planred in peoples brain, not on Evms

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एमआयएमला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. औवेसी यांनी मतदारांचा कौल स्वीकारत म्हटले आहे की, आमची कामगिरी अपेक्षेप्रमाणं झाली नाही. हे भाजपला यश मिळालंय पण ते 80-20 चं यश आहे. आम्ही चांगलं काम केलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना काम करत राहा, असा संदेश देत आहे.



    एमआयएमचा पक्ष प्रमुख म्हणून उत्तर प्रदेशातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उत्तर प्रदेशच्या जनतेचे आभार मानतो. ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यांचा ऋणी आहे. आम्हाला आता यश आलं नसलं तरी आम्ही पुन्हा मेहनत करु.

    बिहार प्रमाणे असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत देखील उमेदवार उभे केले होते. बिहारमध्ये एमआयएमला यश मिळालं होतं. मात्र, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत एमआयएमला एका जागेवर देखील विजय मिळवता आला नाही.

    Owesi says Blame it on chips that are planred in peoples brain, not on Evms

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार