विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : Owaisi’s उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणांमध्ये मोठी हलचल. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना दिलेला पाठिंबा काँग्रेससाठी वरदान की अडचण, यावरच आता चर्चा रंगली आहे. Owaisi’s
काँग्रेसने वारंवार ओवैसींना “भाजपची बी टीम” म्हणून हिणवले. मुस्लीम मतांची फूट पाडून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतात, असा आरोप केला. मग अशा नेत्याचा इंडिया आघाडीला मिळालेला पाठिंबा हा विरोधाभास नव्हे का, असा सवाल काँग्रेसच्या गोटातूनच विचारला जाऊ लागला आहे. Owaisi’s
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मात्र लगेच कृतज्ञता व्यक्त करत ओवैसींच्या पावलाचे स्वागत केले. “हा पाठिंबा लोकशाही आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्वाचा आहे,” असे ते म्हणाले. परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांत आणि काही नेत्यांत याबाबत अस्वस्थता आहे.
ओवैसींनी आपल्या समर्थनाचे स्पष्टीकरण देताना, “सुदर्शन रेड्डी हे निष्पक्ष, प्रामाणिक आणि न्यायप्रिय आहेत. देशाच्या सर्वोच्च पदांवर अशा व्यक्तींची गरज आहे,” असे म्हटले.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ओवैसींच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीला संसदेत संख्याबळाचा फायदा होऊ शकतो, पण राजकीय प्रतिमेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. भाजपविरोधी लढाईत काँग्रेसने ओवैसींचा हात धरला, हे त्यांच्या आधीच्या वक्तव्यांशी विसंगत असल्याने आता ‘डबल स्टँडर्ड’ म्हणण्याची संधी मिळाली आहे.
काँग्रेसला ओवैसींचा पाठिंबा हवाहवासा वाटतो, की भाजपची बी टीम मानलेला हा हातभार त्यांच्यासाठी भविष्यात राजकीय बुमरँग ठरेल? हा प्रश्न आहे.
Owaisi’s support for India Aghadi, excitement in the Congress fold, what is the answer now to those who call him ‘BJP’s B team’?
महत्वाच्या बातम्या
- नवभारताचा रोडमॅप : पायाभूत सुविधांमध्ये होणार क्रांती
- Pakistan : पाकिस्तान बाॅम्बस्फाेटाने हादरले, खैबर पख्तूनख्वा प्रांतात क्रिकेट सामन्यादरम्यान भीषण स्फोट
- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुन्हा ग्वाही
- Vadettiwar : काॅंग्रेसकडून आरक्षणाच्या प्रश्नाला राजकीय रंग, वडेट्टीवार यांचा नागपुरात ऑक्टोबरमध्ये ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा इशारा