वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एआयएमआयएम पक्षाच्या नेत्यांची वादग्रस्त विधाने थांबायलाच तयार नाहीत. पक्षाचे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, या देशात हिजाबवाली महिला पंतप्रधान करायची आहे, हे माझे स्वप्न आहे. त्यामुळे काही लोकांच्या पोटात आणि डोक्यात दुखते, तर एआयएमआयएम पक्षाचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी त्यापुढे जाऊन मुसलमानांनी भारतावर 832 वर्षे राज्य केल्याची आठवण करून दिली आहे. या दोन्ही नेत्यांची वक्तव्य एआयएमआयएम पक्षाची मनोवृत्ती प्रकट करताना दिसतात. Owaisi said, Hijab should be Prime Minister
शिक्षण संस्थांमध्ये हिजाब या वादा संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद दिसून आल्याच्या पार्श्वभूमीवर ओवैसी यांनी भारतात हिजाबवाली महिला पंतप्रधान करायची आहे. हे माझे स्वप्न आहे पण त्यामुळेच काही लोकांचे पोट आणि डोके दुखते, असे वक्तव्य केले होते. त्या पुढे जाऊन एआयएमआयएम पक्षाचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी संभलमध्ये प्रचारसभेत मुसलमानांनी भारतावर 832 वर्षे राज्य केल्याचे वक्तव्य केले आहे.
मुसलमान बादशहांपुढे सगळे हिंदू हात जोडून उभे राहत होते. बादशहाने राणी जोधाबाईला भारताची महाराणी बनवले. मुसलमान तीन-तीन लग्न करत असले तरी ते आपल्या बायकांना समान दर्जा देतात. त्यांना बीबी बनवतात. पण हिंदू मात्र एक बायको करून बाकीच्या दोन बायकांशी संबंध ठेवतात आणि अवैध संतती निर्माण करतात, असे बेलगाम वक्तव्य शौकत अली यांनी केले आहे.
ओवैसी आणि शौकत आली या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यावरून देशभरात संताप उसळला आहे.
Owaisi said, Hijab should be Prime Minister
महत्वाच्या बातम्या
- तुर्कीतील कोळसा खाणीत मोठा स्फोट : 22 जण ठार, अनेक जण अडकल्याची भीती, बचाव कार्य सुरू
- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा का जाहीर झाल्या नाहीत, निवडणूक आयोगाने दिले हे उत्तर..
- दोनदा भाजपबरोबर आयाराम – गयाराम करणारे नितीश कुमार म्हणाले, “भाजप बरोबर कधीच जाणार नाही”!!
- सरकारी नोकरीची संधी : SSC अंतर्गत ९९० पदांसाठीची भरती; करा ऑनलाईन अर्ज