• Download App
    2 MPs : एमआयएमने दाखविले "रंग"; ओवैसी, इम्तियाज जलील यांचे महिला आरक्षण विरोधात मतदान!! Owaisi, Imtiaz Jalil vote against reservation for women

    2 MPs : एमआयएमने दाखविले “रंग”; ओवैसी, इम्तियाज जलील यांचे महिला आरक्षण विरोधात मतदान!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महिला आरक्षण मुद्द्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी मोदी सरकारच्या विरोधात भाषणे केली, तरी देखील त्यांनी 33 % महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठीच मतदान केले.Owaisi, Imtiaz Jalil vote against reservation for women

    मात्र 554 विरुद्ध 2 अशा मतांनी हे विधेयक मंजूर होताना विरोधातली 2 मते एमआयएम पक्षाची निघाली. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान केले. सोशल मीडियावर त्याचे जबरदस्त पडसाद उमटले आणि नेटिजन्सनी असदुद्दीन ओवैसी यांना ट्रोल केले.

    एमआयएम पक्षाच्या खासदारांनी मुस्लिमांची महिला विरोधी मानसिकता दाखवल्याचे टीका नेटिजन्सनी केली. वास्तविक असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिम महिला भेदभावाच्या कशा शिकार होतात, याचे मोठे वर्णन लोकसभेत केले. पण त्याचे खापर त्यांनी मोदी सरकारवर फोडले. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनाही त्यांनी मुस्लिम महिलांच्या हलाखीसाठी जबाबदार धरले.

    देशातील इतर समाजातल्या महिलांपेक्षा मुस्लिम महिला खूप मागास आहेत. त्यांच्यासाठी महिला आरक्षण विधेयकात विशिष्ट टक्क्यांनी जागा ठेवा, अशी मागणी ओवैसी यांनी आपल्या भाषणात केली. पण महिलांना 33 % आरक्षण मिळूनही त्यामधून मुस्लिम महिलांना उमेदवारी देण्याची तयारी ओवैसींनी दाखवली नाही. उलट आहे त्या आरक्षणाला विरोध करून त्यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान केले.

    सोशल मीडियावर त्याचे जोरदार पडसाद उमटले. #2 MPs ट्रेंड झाला. नेटिजन्सनी ओवैसी आणि इम्तियाज जलील या दोन्ही खासदारांना जोरदार ठोकून काढले. एकीकडे मुस्लिम महिलांना मागास म्हणायचे आणि त्यांना जर 33 % आरक्षणातून संधी मिळत असेल, तर ती देखील नाकारायची, हा दुटप्पीपणा एमआयएम पक्षाने केला, असे शरसंधान अनेकांनी सोशल मीडियावर साधले आहे.

    Owaisi, Imtiaz Jalil vote against reservation for women

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार