विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशात समाजावादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या मतपेढीला खिंडार पाडण्यासाठी एमआयएमचे असुद्दीन ओवेसी सक्रीय झाले आहेत. छोट्या पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत. त्यासाठी ओमप्रकाश राजभर, भीम आर्मीचे चंद्रशेखर यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली.Owaisi became active in cracking down on SP, BSP polls, trying to bring Omprakash Rajbhar, Chandrasekhar and other small parties together
ओवेसी यांनी या दोन नेत्यांच्या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे आता हे तीनही पक्ष एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओमप्रकाश राजभर यांनी भागदीदारी संकल्प मोर्चा आणि चंद्रशेखर रावण यांची आझाद समाज पार्टी यांच्यासोबत एमआयएमची आघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. हे तीन पक्ष एकत्र आले तर दलीत आणि मागास जातींसोबतच मुस्लिम मतपेढीही त्यांच्या बाजुला जाऊ शकते. यामुळे उत्तर प्रदेशातील समीकरणेच बदलणार आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवयांनी यादव, मुस्लिम आणि मागास जातींच्या पाठिंब्यावर सत्तेवर येण्याची तयारी केली आहे. मात्र, ओवेसींच्या संभाव्य आघाडीमुळे अखिलेश यादव यांच्या मतपेढीचा पायाच खचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर दलीत आणि ब्राम्हण समाजाच्या मतपेढीवर सत्तेची चावी मिळविण्याच्या प्रयत्नांत असलेल्या मायावती यांचेही मनसुबे ही आघाडी उधळून लावू शकते.
उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांत मोठे पक्ष दुसऱ्या मोठ्या पक्षांसोबत आघाडी करण्याऐवजी छोट्या पक्षांसोबत युती करणे पसंत करत आहेत. समाजवादी पक्षाने जनवादी पार्टी आणि महान दल यांच्यासोबत आघाडीची घोषणा केली आहे. याशिवायही आणखी अनेक पक्षांना आपल्यासोबत घेण्याचा अखिलेश यांचा प्रयत्न आहे.
भारतीय जनता पक्षानेही छोट्या पक्षांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अपना दल, निषाद पार्टी यांच्यासोबत भाजपा निवडणूक लढविणार आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात ३२ छोट्या पक्षांनी निवडणूक लढविली होती. त्यांनी लक्षणीय मते घेतली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही छोट्या पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
Owaisi became active in cracking down on SP, BSP polls, trying to bring Omprakash Rajbhar, Chandrasekhar and other small parties together
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा पती मोहसीन शेख का झालाय ठाकरे कुटुंबाचा लाडका!
- तालिबानला मान्यता वगैरे नंतर, आधी अडकलेल्या भारतीयांना आणण्यास प्राधान्य; अफगाणिस्तानातील परिस्थितीवर केंद्राचे स्पष्टीकरण
- Corona Vaccination : कोरोनाविरुद्ध लसीकरणाचा देशात नवा विक्रम, एका दिवसात ९३ लाखांहून जास्त डोस दिले
- दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय, वाजपेयी-जेटली यांच्या नावांनीही केंद्रांची उभारणी