• Download App
    Pakistani beggars 5402 पाकिस्तानी भिकारी अरब देशांनी हाकलले पाहा; भारतातल्या कुठल्या नव्हे, तर मोहम्मद अली जिनांच्या पेपरने दिलेली बातमी वाचा!!

    5402 पाकिस्तानी भिकारी अरब देशांनी हाकलले पाहा; भारतातल्या कुठल्या नव्हे, तर मोहम्मद अली जिनांच्या पेपरने दिलेली बातमी वाचा!!

    नाशिक : भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्ष दरम्यान भारताला थेट अणुबॉम्ब युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तान आतून किती पोखरला गेलाय आणि त्याची आर्थिक अवस्था किती भीषण आहे, याचा आलेख एका वेगळ्याच बातमीतून आज समोर आला. पाकिस्तानातून वेगवेगळ्या मार्गांनी सौदी अरेबिया आणि अन्य अरब देशांमध्ये पोहोचलेले आणि तिथे जाऊन रस्त्या रस्त्यांवर भीक मागणारे एक दोन नव्हे, तर तब्बल 5402 भिकारी सौदी अरेबिया सह अरब देशांनी वेचून पाकिस्तानात हाकलून दिले आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या दिवाळखोर जिहादी वर्तनाला सगळ्यात जगासमोर उघडे पाडले. Pakistani beggars

    ही बातमी भारतातल्या किंवा युरोपमधल्या कुठल्या माध्यमाने दिली असती तर पाकिस्तानने ती fake news म्हणून फेकून दिली असती, पण ही बातमी भारतातल्या किंवा युरोपमधल्या कुठल्या माध्यमाने दिलेली नाही, तर पाकिस्तानचे संस्थापक बॅरिस्टर मोहम्मद जिना यांनी स्थापन केलेल्या The Dawn या वृत्तपत्राच्या वेब पोर्टलने ही बातमी प्रकाशित केली आहे. यात याच वेब पोर्टलने पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या सगळ्या “कर्तृत्वाचे” पुरते वाभाडे काढले आहेत.



    भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या संघर्षात तिथे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी पाकिस्तानची संसद नॅशनल असेंब्लीचे विशेष अधिवेशन घेतले. त्या अधिवेशनात भारताच्या विरोधात जोरदार भाषण ठोकले. भारताविरुद्ध सगळी पाकिस्तानी फौज जी जान से लढेल, अशी गर्जना त्यांनी केली. पण त्याच नॅशनल असेंब्लीच्या अधिवेशनात पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी सौदी अरेबिया आणि अन्य अरब देशांमधून पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून दिल्याची आकडेवारी सांगितली. त्यामुळे सगळी नॅशनल असेंब्ली अवाक झाली.

    https://www.dawn.com/news/1911076

    2024 जानेवारी ते एप्रिल 2025 या कालावधीत सौदी अरेबिया, इराक, कतार, ओमान, युनायटेड अरब अमिरात या देशांनी 4850 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलले. यात एकट्या सौदी अरेबियाने हाकललेले पाकिस्तानी भिकारी 5033 असून आणखी 369 भिकारी वेगवेगळ्या देशातून पाकिस्तानात येणे अपेक्षित आहे, अशी माहिती मोहसीन नक्वी यांनी दिली. हे भिकारी पाकिस्तान मधल्या नेमके कुठल्या राज्यांमधले आहेत, त्यांचा आकडेवारीचा तक्ता देखील त्यांनी नॅशनल असेंब्लीत सादर केला. त्यानुसार सर्वाधिक 2795 भिकारी सिंध प्रांतातले असल्याचे सिद्ध झाले. त्या खालोखाल 1437 पंजाब आणि 125 खैबर पख्तूनवा प्रांतातले भिकारी असल्याचे आकडेवारीने सांगितले. बलुचिस्तान प्रांतातून 125 भिकारी अरब देशांमध्ये गेले होते त्या सगळ्यांनाही परत पाठविण्यात आले. आझाद अर्थात पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधले 33 आणि इस्लामाबाद येथे 10 भिकारी देखील परत आले.

    भारत आणि पाकिस्तान यांच्या टोकाच्या संघर्षाच्या काळात ही बातमी प्रसिद्ध करावी लागल्याने अरब देशांमध्ये पाकिस्तानची पुरती नाचक्की झाली. पाकिस्तान हा मुस्लिम देश असूनही अरब देश पाकिस्तानला आपल्याबरोबरीचा देश समजत नाहीतच, उलट आपल्या देशांमध्ये भिकारी पाठवून उपद्रव देणारा देश समजतात, हे सिद्ध झाले. अरब देशांना आलेला पाकिस्तानचा अनुभवच तसा आहे म्हणून कायद्याचा बडगा दाखवून अरब देशांनी पाकिस्तानी भिकाऱ्यांना परत पाकिस्तानात पाठवून दिले. मोहम्मद अली जिना यांनी स्थापन केलेल्या The Dawn या वर्तमानपत्राला ही बातमी प्रसिद्ध करावी लागली.

     

    Over 5,000 Pakistani beggars deported from Saudi Arabia so far, NA informed – Pakistan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pentagon official : पाकिस्तान श्वानाप्रमाणे दोन पायांत शेपूट घालून युद्धविराम करण्यासाठी पळत सुटला, पेंटागाॅनच्या माजी अधिकाऱ्याची कडवट टीका

    Colonel Sophia Qureshi : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान मंत्र्याला भाेवले, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

    शरद पवार NDA सोबत असते, तर ते राष्ट्रपती झाले असते; हा रामदास आठवलेंचा टोला, टोमणा की जखमेवर मीठ??