विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रशियाचा युक्रेन वरचा अणुबाँब हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तक्षेपाने टळला, असा रिपोर्ट CNN ने अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिला आहे. Outreach by PM Narendra Modi to Russian President Putin helped prevent first nuclear attack since Hiroshima and Nagasaki
2023 मध्ये रशिया – युक्रेन युद्धादरम्यान अशी एक वेळ आली होती की, जेव्हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन गांभीर्याने युक्रेन वर अणुबाँब हल्ला करायच्या विचारात होते. तो अणुबाँब हल्ला त्यांनी केला असता, तर अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी वर केलेल्या अनुभव हल्ल्यानंतरचा तो सर्वांत मोठा अणुबॉम्ब हल्ला ठरला असता.
पण पुतिन यांच्या हालचालींची भनक अमेरिकन अधिकाऱ्यांना लागल्यावर त्यांनी भारत आणि चीन यांच्या सर्वोच्च नेत्यांशी संपर्क साधला. भारताच्या सर्वोच्च नेत्याने रशियन अध्यक्षांना संपर्क करून त्यांच्याशी बातचीत केली आणि त्याचा परिणाम म्हणून रशियाचा युक्रेन वरचा अणुबॉम्ब हल्ला टळला असावा, असे अमेरिकेतील परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निरीक्षण नोंदविले.
अमेरिकन वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंदविलेल्या या निरीक्षणाचे गांभीर्य आणि महत्त्व असे की, रशियाच्या अध्यक्षांनी जर खरंच आपला विचार अंमलात आणून युक्रेन वर अणुबॉम्ब हल्ला केला असता, तर तो जागतिक युद्धाला निमंत्रण देणारा ठरला असता. ते युद्ध सर्व खंडांमध्ये पसरून ते कुठल्याही मानवी शक्तीच्या नियंत्रणापलीकडे गेले असते आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील हानी पेक्षा तिसरा महायुद्धातली हानी अधिक गंभीर आणि भयावह ठरली असती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना अणुबॉम्ब हल्ला करण्यापासून परावृत्त केले, असे अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने CNN ने आपल्या रिपोर्टमध्ये आवर्जून नमूद केले आहे.