वृत्तसंस्था
बिजींग : रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये जवळपास दोन वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर चीनमधील शांघाय शहरातील शाळा बंद करण्यात आल्या असून अनेक शहरेही बंद करण्यात येत आहेत. यापूर्वी काही शहरांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अनेक शहरांमध्ये संसर्ग पसरत आहे
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार, रविवारी येथे सुमारे ३४०० नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. शनिवारच्या तुलनेत ही प्रकरणे दुप्पट आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढवली आहे. रिपोर्ट्सनुसार, चीनमधील काही शहरांचे अनेक भाग हळूहळू बंद केले जात आहेत.
चीनमधील अनेक शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. जवळपास अर्धा डझन शहरांमध्ये बाधित नोंद झाले आहेत. जिलिन शहरात सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. शनिवारी येथे १४१२ रुग्ण दाखल झाले आहेत. त्याच वेळी, वेगवेगळ्या शहरांमध्येही संसर्ग वाढत आहे.
Outbreaks appear to be exacerbated during this time
महत्त्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पाडण्याचा रशियाचा इशारा रशियन सैन्य राजधानी कीवच्या अगदी जवळ
- देवेंद्र फडणवीसांना बजावलेल्या नोटीसीची भाजप राज्यभर होळी करणार
- ना फ्लॉवर है, ना बटर है, फक्त बटरफ्लाय, अर्थसंकल्पात कोकणवर अन्याय झाल्याचा आरोप करत नितेश राणेंचा उदय सामंतावर निशाणा
- उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्तीसाठी रवाना, मनसेची खोचक टीका